Marathi News> मनोरंजन
Advertisement

Alia Bhatt Corona : आलिया भट्टला कोरोनाची लागण

कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय

Alia Bhatt Corona : आलिया भट्टला कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाबाधितांचा आकडा मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहे. असं असताना बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. (Alia Bhatt tests positive for coronavirus)  अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. 

काय म्हटलंय आलियाने?

fallbacks

आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मला कोरोनाची लागण झाली आहे. हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. कोरोनाचे सर्व प्रोटोकॉल्स आणि डॉक्टरांच्या सूचनेचे मी पालन करत आहे. तुमच्या प्रेम आणि आधाराबद्दल धन्यवाद, सर्वांनी काळजी घ्या, असे आलिया भट्टने यात म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी आलियाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता रणबीर कपूरला देखील कोरोनाची लागण झाली होती. आलियाच्या बर्थ डे पार्टीला देखील तो यामुळे उपस्थित राहिला नव्हता. मात्र ती पार्टी अरेंज करून त्याने आलियाला खूप छान बर्थ डे गिफ्ट दिलं होतं. 

आपल्याला माहितच आहे आलिया आणि रणबीर लवकरच लग्न करणार आहे. आता ते अनेकदा एकत्र दिसतात. आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी देखील असतात. चाहत्यांची बॉलिवूडमधील ही आवडती जोडी आहे. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. आमिर खान, कार्तिक आर्यन, परेश रावल यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाबाधित झाले आहेत. तर आर माधवनने मजेशीर पद्धतीने कोरोनाबाधित असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याशिवाय रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन वरुण धवन, नीतू सिंह यांसह अनेकांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

Read More