Marathi News> मनोरंजन
Advertisement

पहिल्यांदाच आलिया Mrs. Kapoor म्हणून जगासमोर; रणबीरची नजर हटेना

दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. 

पहिल्यांदाच आलिया Mrs. Kapoor म्हणून जगासमोर; रणबीरची नजर हटेना

मुंबई : दोघांचीही कुटुंब आणि मित्रपरिवार यावेळी त्यांना साध देताना आणि मोठा आधार देताना दिसला. सर्वांचे आशीर्वाद आणि सदिच्छा स्वीकारत आलिया आणि रणबीर आता मिस्टर आणि मिसेस कपूर, म्हणून ओळखले जातील.

लग्नासाठी आलिया आणि रणबीरचा लूकही तितकाच देखणा होता. सुरेख अशा साडीत नववधू आलियाचं सौंदर्य खुलून आलं आहे. तर, तिच्या सौंदर्यानं गारद झालेला रणबीरही तितकाच रुबाबदार दिसत होता. रणबीरने शाही पद्धतीतली शेरवाणीने आपला लूक पुर्ण केला. तर आलियाने पांढऱ्या रंगाची साडी, हेवी ज्वेलरी आणि डोक्यावर ओढणी घेवून आपला सोज्वळ लूक पुर्ण केला. या लूकमध्ये आलिया आणि रणबीर खूपच गोड दिसत आहेत. नुकतचं हे कपल मीडियासमोरही आलं. मीडियासमोर येवून या कपलने पोजही दिल्या. यावेळी या दोघांच्याही डोळ्यात आनंदआश्रू दिसत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

फक्त आलिया-रणबीर  नव्हेतर वऱ्हाड्यांचे वेडिंग लूक्सही तितकेच चर्चेत राहिले. लग्नासाठी करण जोहर, अयान मुखर्जी हे आलियाचे खास मित्रही उपस्थित होते.

छोटेखानी तरीही लक्षवेधी अशा या विवाह सोहळ्यानंतर लगेचच कपूर कुटूंबाच्या घराबाहेर असणाऱ्या पापाराझींचही तोंड गोड करण्यात आलं. या नवविवाहित दाम्पत्याला झी 24 तास कडून नव्या आयुष्याच्या अगणित शुभेच्छा

Read More