Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO : आलियावर प्रेमाचा रंग, वरूणला मारली रणबीर म्हणून हाक

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात.

VIDEO : आलियावर प्रेमाचा रंग, वरूणला मारली रणबीर म्हणून हाक

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या नात्याच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. त्यांनी कित्यंकदा त्यांच्या नात्याला मान्यता दिली आहे. नुकताच एका मुलाखतीत आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर आणि वरूण धवण उपस्थित होते. रंगत असलेल्या गप्पांमध्ये आलियाने रणबीरचे नाव घेतले होते. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Awww Aliabhatt just Referred to #Varundhawan as #RanbirKapoor All credits goes to the owner

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt.x) on

प्रेमात पडलं की सगळीकडे आपल्याला तिच व्यक्ती दिसते. असचं काहीस आलिया सोबत झालं आहे. रणबीरच्या प्रेमाचा रंग आलियावर चांगलाच चढला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिने वरूणला चक्क रणबीर म्हणून हाक मारली, त्यानंतर तिच्या बाजूला बसलेले सोनाक्षी आणि आदित्य मोठ्याने हासू लागले.  

मागील काही दिवसांपासुन आलिया - रणबीरच्या लग्नाच्या चर्चांना चांगलेच उधान येत आहे. त्यांच्या साखपुड्यासाठी ऋषी कपूर लवकरच भरतात परतणार आहे. हे दोघेही त्यांच्या शुटिंगमध्ये चांगलेच व्यस्त आहेत.

Read More