Marathi News> मनोरंजन
Advertisement

आलियाचा 'कलंक' सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला

आलिया भटसाठी 2019 खूपच खास असणार आहे

आलियाचा 'कलंक' सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला

मुंबई:बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.सिनेमा गली बॉय मध्ये ती एका मुस्लिम मुलीची भूमिका साकारत आहे. 14 फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित होणार. 'गली बॉय'नंतर आलियाचा कलंक सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला. नुकताच आलियाने सिनेमाची शूटिंग पूर्ण केली. शूटिंग संपल्याचे फोटो आलिया आणि टिमने सोशल मीडियावर शेअर केलेत. 

 

 
सिनेमात आलियासोबत वरून धवन झळकणार आहे. त्याचबरोबर सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, माधुरी दीक्षित-नेने आणि आदित्य रॉय कपूर अशी तगडी स्टारकास्ट असलेला कलंक सिनेमा 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पण यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. सिनेमाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अभिषेक वर्मन यांनी केले. सिनेमाची निर्मिती करण जोहर, साजिद नाडियादवाला, हीरू यश जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केले आहे.

आलिया भट्टसाठी 2019 खूपच खास असणार आहे. 14 फेब्रुवारीला 'गली बॉय' प्रदर्शित होत आहे. सिनेमातील आलियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आलिया कलंक सिनेमानंतर पहिल्यांदाच वडील महेश भट्ट यांच्यासोबत 'सडक 2' या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या शूटमध्ये बिझी आहेत. येत्या ऑगस्टमध्ये 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होत आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर साखरपुडा करणार असल्याचे कळत आहे.

Read More