Priyanka Chopra and Allu Arjun : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनची चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. आता तो एका नव्या प्रोजेक्टमध्ये ती व्यग्र आहे. तो आता लवकरच लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीसोबत या त्याच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव A6 असं आहे. बिग बजेट असलेल्या चित्रपटात प्रियांका चोप्राची एन्ट्री होणार असल्याची बातमी आहे. या चित्रपटात अॅक्शन, ड्राम असणार आहे असं म्हटलं जात आहे. हा चित्रपट नक्कीच अॅटलीच्या स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. अल्लू अर्जुननं देखईल पुष्पा या त्याच्या चित्रपटानंतर आता या चित्रपटाला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय दिला आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरु होण्याआधी अॅटली प्रियांका चोप्रासोबत या चित्रपटाविषयी बोलणार आहे. जर तिला भूमिका आवडली किंवा तिच्या हातात कोणते प्रोजेक्ट नसले तर या चित्रपटात ती आणि अल्लू अर्जुन एकत्र दिसतील.
रिपोर्ट्सनुसार, अॅटलीच्या या चित्रपटात प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत असण्याची मोठी शक्यता आहे. अल्लू अर्जुन आणि प्रियांकाला एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे. तर हा चित्रपट ग्रॅंड लेव्हलवर बनवण्यात येणार आहे. अशात असं म्हटलं जातं की शाहरुख खानच्या जवान प्रमाणेच अल्लू अर्जुनचा देखील डबल रोल असणार आहे. तर या चित्रपटाची घोषणा अल्लू अर्जुनच्या वाढदिवसाच्या दिवशी करण्याच्या चर्चा आहेत.
हेही वाचा : अक्षय कुमारच्या मुलासोबत असलेली 'ती' मिस्ट्री गर्ल कोण? ईद पार्टीमध्ये मुलीसोबत दिसला आरव
दरम्यान, त्या दोघांच्या कामाविषयी बोलायचं झालं तर प्रियांका चोप्राही दिग्दर्शक एसएस राजामौलीसोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता महेश बाबू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रियांका अमेरिकेहून हैदराबादला प्रवास करताना दिसणार आहे. चित्रपटात अॅक्शन आणि चांगली पटकथा असणार आहे. त्यासोबत प्रियांका आणि महेश बाबू हे स्क्रीनवर दिसणार आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर अल्लू अर्जुनचा काही दिवसांपूर्वी 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. त्या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. तर या चित्रपटाच्या क्लायमॅक्सला पाहून या चित्रपटाचा 3 भाग देखील येऊ शकतो असं म्हटलं जात आहे.