Marathi News> मनोरंजन
Advertisement

5 व्या दिवशी 'पुष्पा 2'च्या कमाईत 54 टक्के घसरण, जगभरात केली इतकी कमाई

'पुष्पा 2' चित्रपट 2024 मधील सर्वात कमी दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरलाय. मात्र, 5 व्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईमध्ये घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. 

5 व्या दिवशी 'पुष्पा 2'च्या कमाईत 54 टक्के घसरण, जगभरात केली इतकी कमाई

Pushpa 2 : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फाजिल यांच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'पुष्पा 2' हा 2024 मधील सर्वात मोठा चित्रपट होण्याच्या मार्गावर आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईमध्ये वाढ होताना दिसत आहे. सध्या हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. 'पुष्पा 2' चित्रपटाने आतापर्यंत 900 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे. म्हणजे हा चित्रपट सुपरहिट होण्याच्या मार्गावर आहे.

'पुष्पा 2' हा मेगा बजेट चित्रपट आहे. ज्याचे बजेट जवळपास 400 कोटी रुपये आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने चित्रपटाचे बजेट अवघ्या दोन दिवसांमध्ये काढले आहे. आता 'पुष्पा 2' चित्रपट नफ्याच्या मार्गावर आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या या चित्रपटाला जगभरातून प्रेक्षकांचे प्रेम मिळत आहे. 
   
'पुष्पा 2' च्या कमाईत 5 व्या दिवशी घट

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाने 5 व्या दिवशी भारतात 64.45 कोटींची कमाई केली. याचा अर्थ वीकेंडच्या दिवसांमध्ये 141 कोटींची कमाई झाली होती. या संदर्भात 'पुष्पा 2' ची कमाई 54.31 टक्के घसरली आहे. यामागचे कारण म्हणजे सोमवार हा कामकाजाचा दिवस असल्याने कमाईत घट झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु, तरी देखील सोमवारी 'पुष्पा 2' ने  64.45 कोटींची कमाई केली आहे. 

'पुष्पा 2' ची जगभरातील कमाई

रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2' चित्रपटाने पाच दिवसांमध्ये निव्वळ कलेक्शनमध्ये 593.45 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे तर एकूण संकलन 709 कोटी रुपयांची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने 880 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

'पुष्पा 2' चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांमध्ये अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाने 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'स्त्री 2' चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. लवकरच 'पुष्पा 2' हा चित्रपट 'कल्की' चा रेकॉर्ड मोडू शकतो असं म्हटलं जात आहे. 

Read More