Marathi News> मनोरंजन
Advertisement

VIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

Allu Arjun Fan: आपल्या आवडत्या कलाकारासाठी प्रेक्षक, चाहते हे अक्षरक्ष: वेडे होतात. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या असाच एक व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे ज्यातून तुमच्या हेही लक्षात येईलच. आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी अल्लू अर्जुननं जे केलं ते पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केले आहे. 

VIDEO: दिव्यांग चाहत्यासाठी 'पुष्पा'ची दिलदार कृती, भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद

Allu Arjun Video: कलाकारांसाठी प्रेक्षक हे जितके महत्त्वाचे असतात तितके प्रेक्षकांसाठी कलाकारही. चित्रपटाच्या माध्यमातून का होईना प्रेक्षकांना ते घटकाभर आनंद देतात, त्यांची करमणूक करतात. त्यामुळे प्रेक्षकांची कलाकारांमध्ये जोरात चर्चा रंगलेली असते. कलाकार हे किती डाऊन टू अर्थ असतात याचीही प्रचिती आपल्याला चित्रपटातून येताना दिसते. त्यामुळे त्यांच्या मोठेपणाचाही उदो उदो होताना दिसतो. सध्या लोकप्रिय दाक्षिणात्त्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा एक व्हिडीओ हो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होताना दिसतो आहे.

यावेळी त्यानं आपल्या चिमुरड्या चाहत्यासाठी जे काही केलं आहे ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत. त्याची सर्वत्र स्तुती होताना दिसते आहे. अल्लू अर्जुन हा लोकप्रिय दाक्षिणात्त्य कलाकार आहे त्यामुळे त्याची सर्वत्र जोरात चर्चा होताना दिसते. यावेळीही त्याची चर्चा रंगलेली आहे. चला तर मग पाहुया की या व्हिडीओत नक्की काय विशेष आहे. 

अल्लू अर्जुनचे जगभरात फॅन्स आहेत. त्यामुळे त्याची सतत चर्चा रंगलेली असते. त्याचा 'पुष्पा' हा चित्रपट इतका गाजला की आता लवकरच याचा पुढचा भागही प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच हवा आहे. नेटकरी नेहमीच अशी टीका करतात की या सेलिब्रेटींना फारच माज आहे.

हेही वाचा : VIDEO: काजोलला पाहताच 'तो' धाडकन पडला; नेटकरी म्हणाले, 'हा तर नवा गडी...'

त्यांना आपल्या चाहत्यांशी नीट बोलताही येत नाही की नीट वागताही येत नाही. मध्यंतरी करीना कपूरच्या स्वभावाबद्दल, तिच्या अॅटिट्युडबद्दल व्यावसायिक नारायण मुर्ती यांनीही भाष्य केले होते. एकाच फ्लाईटमध्ये असताना कशाप्रकारे करीनाला भेटायला तिचे फॅन्स येत होते परंतु करीनानं त्यांना पाहिलंही नाही आणि चक्क तिला डावललं, याचीही बरीच चर्चा रंगलेली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावेळी अल्लू अर्जुनला भेटायला एक छोटासा फॅन येतो. हा लहान अपंग होता. जो व्हिलचेअरवर बसून आला होता. तेव्हा त्याला आपली सही देत 'झुकेगा नहीं साला' म्हणणारा पुष्पा म्हणजे अल्लू अर्जुनही झुकला आणि प्रेमानं त्याला आपली स्वाक्षरी दिली आणि ती पाहताच त्या चिमुरड्याच्या चेहऱ्यावर हसू आले होते. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. तुम्हालाही पाहून नक्कीच हे म्हणावसं वाटेल की गर्वाचे घर हे खाली असावे. सध्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नानाविध कमेंट्सही केल्या आहेत.  

Read More