Marathi News> मनोरंजन
Advertisement

'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल

Ameesha Patel :  बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सोशल मीडियावर सतत तिचे बिकिनीतील फोटो आणि व्हिडीओ सतत चर्चेत असतात. त्यात आता तिनं केलेल्या वक्तव्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

'सेक्शुअली इंटीमेट सीन्स, आई-बहिणीवरून शिवीगाळ...', 'गदर 2' फेम अमीषा पटेल ट्रोल

Ameesha Patel : बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल ही सध्या तिच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अमीषा पटेलनं सकीना ही भूमिका साकारली आहे. तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा आकडा पार केला आहे. तर चित्रपटाच्या निमित्तानं अमीषा अनेक मुलाखत देताना दिसते. यावेळी मुलाखतीत अमीषानं सेक्शुअली इंटिमेट होण्यापासून आणि शिवीगाळ करण्यापर्यंत अनेक गोष्टी स्क्रिनवर करण्यात तिला अस्वस्थ होतं. त्यानंतर तिला ट्रोल करण्यात आले आहे. त्यावेळी आता अमीषा आणि सलमान खानचा देखील उल्लेख केला होता. 

अमीषा पटेलनं ही मुलाखत इंस्टंट बॉलिवूडला दिली होती. यावेळी अमीसाला विचारण्यात आलं की अशी कोणती गोष्ट आहे जी तिला करायची नाही आणि त्या गोष्टीच्या ती विरोधात आहे? यावर उत्तर देत अमीषा म्हणाली की सेक्शुअली इंटिमेट सीन्स, किस करणं किंवा मग छोटे छोटे कपडे मला जो पर्यंत परिधान करण्यास सांगितले जात नाही तो पर्यंत मी तिच्या विरोधात नाही. जसं नेहमीच सलमान बोलतो की मी ऑनस्क्रिन किस करणार नाही. सनी देओलचे देखील स्वत: च्या काही अटी आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अमीषा याविषयी बोलताना पुढे म्हणाली की तुम्हाला तुमच्या मर्यादा ठरवायला हव्या की तुम्ही कोणत्या मर्यादेपर्यंत कम्फर्टेबल राहा. तर मी हॉट दिसण्यात नाही. मी सेक्शुअली इंटीमेट सीन्स देण्यात कम्फर्टेबल नाही आहे, मी नेहमी वेगवेगळे प्रकारचे कपडे परिधान करण्यात कम्फर्टेबल नाही आहे. मी स्क्रीनवर आई-बहिणीवरून शिवी देण्यात कम्फर्टेबल नाही. मी स्क्रीनवर किस करण्यापासून अशा अनेक गोष्टींमध्ये कम्फर्टेबल नाही. 

अमीषा पटेलतं हे वक्तव्य आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतरच तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. खरंतर, अमीषा पटेलनं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिचे अनेक बोल्ड बिकिनीतील फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर 'कहो न प्यार है' आणि 'गदर' या चित्रपटांमध्ये ती रोमॅन्टिक झाली आहे. हे सगळं पाहता तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. 

हेही वाचा : भारती सिंगच्या घरी पुन्हा एकदा हलणार पाळणा? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा

अमीषाच्या 'गदर 2' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात तिच्यासोबत त्यानं बॉक्स ऑफिसवर 400 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्डही मोडले आहेत. 

Read More