Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिषा पटेलने सर्वच मर्यादा ओलांडल्या, 'तो' VIDEO केला शेअर

वयाच्या 46 व्या वर्षी अमिशा पटेलने सर्वच मर्यादा ओलांडल्या, बीचवरचा VIDEO केला शेअर

अमिषा पटेलने सर्वच मर्यादा ओलांडल्या, 'तो' VIDEO केला शेअर

मुंबई : अभिनेत्री अमिशा पटेल (Ameesha Patel)  सध्या बॉलिवूडपासून (Bollywood) दुर असली तरी सोशल मीडियावर नेहमीच ती अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने ती या वयातही किती बोल्ड आहे, हे दाखवून दिले आहे. अमिषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय? 

अमिषा पटेल (Ameesha Patel)  दररोज सोशल मीडियावर अनेक बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. हे व्हिडिओ चार चौघात पाहावे की नाही अशीही पंचाईत असते. असाच एक व्हिडिओ आता तिने पुन्हा एकदा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री अमिषा पटेल टू-पीस घालून समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. 

व्हिडिओत अमिषा पटेल (Ameesha Patel)  तिची पाठ दाखवत चालली आहे आणि कॅमेरा तिचा पाठलाग करताना दिसतोय. अमिषा पटेलने कॅमेरात तिचा चेहरा दाखवला नसला तरी तिच्या बोल्ड स्टाईलने चर्चेत आली आहे.अभिनेत्रीचा हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत. 

आलिया भट्टने मीडियाची मागितली माफी, VIDEO होतोय व्हायरल

लुकची चर्चा 
अमिषा पटेलने (Ameesha Patel)  स्काय ब्लू कलरचा टू-पीस परिधान केला आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी अमिषाने तिचे केस खुले ठेवले आहे. तर काळा गॉगल घालत तिने तिचा लूक आणखी आकर्षक केला आहे. 

दरम्यान अमिषा पटेल (Ameesha Patel)  सोशल मीडियावर एकापेक्षा एक बोल्ड व्हिडिओ शेअर करत असते. या व्हिडिओंमध्ये अमिषा पटेल कधी बोल्ड ड्रेस घालून चाहत्यांना व्हिडिओ कॉल करताना दिसत आहे, तर कधी बिकिनी घालून बोल्ड व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. अमिषाचा प्रत्येक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. 

Read More