Marathi News> मनोरंजन
Advertisement

खरच त्यांच्या नात्यात दुरावा आला का?; राकेश बापटच्या पोस्टनंतर एकच खळबळ

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता राकेश बापट आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे.

खरच त्यांच्या नात्यात दुरावा आला का?; राकेश बापटच्या पोस्टनंतर एकच खळबळ

मुंबई : टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता राकेश बापट आजकाल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये शमिता शेट्टी आणि राकेश बापट एकमेकांच्या जवळ आले होते. यानंतर शमिता बिग बॉस 15 मध्येही दिसली. शो संपल्यानंतर या जोडप्याची जवळीक आणखीनच वाढली.

शमिता शेट्टी आणि राकेश बापटही फॅमिली फंक्शनमध्ये एकत्र दिसले होते. आता हे कपल कधी लग्नबंधनात अडकणार याची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे. मात्र त्याआधीच गेल्या काही दिवसांपासून हार्टब्रेकिंग बातमी समोर येत आहेत.

शमिता शेट्टी आणि राकेश बापट यांच्या ब्रेकअपच्या अफवा ऐकायला मिळत आहेत. मात्र आता दोघंही वेगळे झाले आहेत यावर पूर्णपणे शिक्कामोर्तब झालं आहे. खरंतर, राकेशने नुकतंच इंस्टाग्रामवर असं काही शेअर केलं आहे. ज्यामध्ये लोकं शमिता शेट्टीशी ही लिंक जोडण्यात गुंतले आहेत.

राकेश बापटने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्टर शेअर केली आहे. ज्यामध्ये सिंह मधलं बोट दाखवताना दिसत आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे,  तुम्ही काय करत आहात, कोणालाही सांगू नका. तुम्ही बनवलेल्या गोल्सना बाहेरची उर्जा संपवू शकते. 

fallbacks

अखेर राकेशने ही पोस्ट कोणत्या संदर्भात केली आहे. हे फक्त त्याच त्यालाच माहीत आहे. पण फॅन पेजवरील लोक असा अंदाज लावत आहेत की, अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील खळबळ लक्षात घेऊन ही पोस्ट केली आहे. नुकतंच राकेश बापटने मुलाखतीदरम्यान शमिता शेट्टीसोबतच्या ब्रेकअपवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे या विषयावर जास्त बोलणं त्याला योग्य वाटलं नाही. कारण राकेश आणि शमिता यांनी त्यांचं नातं नेहमीच खाजगी ठेवलं आहे. त्यामुळे ते यावर काहीही बोलू इच्छित नाहीत.

Read More