Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sushmita Sen च्या रिलेशनशिपच्या बातम्यांदरम्यान, एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलकडून व्हिडिओ शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे.

Sushmita Sen च्या रिलेशनशिपच्या बातम्यांदरम्यान, एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलकडून व्हिडिओ शेअर

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. सुष्मिता सेन मागील अनेक वर्षांपासून रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये होती. रोहमन जरी सुष्मितापेक्षा वयाने लहान असला तरी चाहत्यांनी दोघांची जोडी खूप पसंत केली होती. आता सुष्मिताला ट्रोल केलं जात असताना रोहमनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तो एक खास सल्ला देताना दिसत आहे.

रोहमन शॉलने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहमन म्हणताना दिसत आहे की, यार प्रेमात सगळेच इतके दुःखी का असतात? तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला खूप अपेक्षा असतात.. व्हिडिओमध्ये रोहमन पुढे म्हणताना दिसला की, तुमच्या पार्टनरला आधीच अनेक गोष्टी करायच्या असतात. तो तुम्हाला पूर्ण करेल अशी अपेक्षा तुम्ही का करतात? तुम्ही स्वतः पूर्ण का करत नाही?

रोहमन पुढे व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय की, कोणाकडून कशाची अपेक्षा का करायची, स्वतः आनंदी राहा आणि तुमच्याशिवाय दुसरं कोणीही तुम्हाला आनंदी करू शकत नाही. पुढे सल्ला देताना त्याने असंही सांगितलं आहे की, असं करू नका आणि इतर कोणाला त्रास देऊ नका, तुम्हाला खुश करण्यासाठी कोणाकडूनही तुम्ही ठेका घेतला नाही. तर आनंदी राहा...'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा व्हिडीओ शेअर करत रोहमनने लिहिलं आहे की, तुझ्याशिवाय कोणीही तुला पूर्ण करू शकत नाही… रोहमनचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. इतकंच नाही तर चाहते रोहमनच्या शांत आणि समजूतदार वागण्याचं कौतुक करत आहेत.

Read More