Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिकीनीवरून ट्रोल करणाऱ्यांना आयराचं सडेतोड उत्तर...पुन्हा शेअर केले बिकीनीतले फोटो

आयरा खानने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.

बिकीनीवरून ट्रोल करणाऱ्यांना आयराचं सडेतोड उत्तर...पुन्हा शेअर केले बिकीनीतले फोटो

मुंबईः आमिर खानची मुलगी आयरा खान तिच्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असते. इराचे फोटो सोशल मीडियावर येताच चर्चेत राहतात. अलीकडेच, आयराने तिच्या 25 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ती बिकिनी परिधान करताना दिसली होती. 
आयराला बिकिनीमध्ये पाहून अनेकांनी तिला खूप ट्रोल केलं. मात्र आता आमिरच्या मुलीने सर्व ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलंय.

आयरा खानने तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. विशेष बाब म्हणजे बिकिनी फोटोंवरून ट्रोल झाल्यानंतरही आयराने बिकिनीतील तिचे आणखी काही फोटो शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

फोटोंमध्ये आयरा खान तिच्या मैत्रिणींसोबत पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. एका छायाचित्रात आयरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला पूलमध्ये मिठी मारताना दिसत आहे... एका फोटोमध्ये आयरा खान आणि फातिमा सना शेख पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. 

आयरा फातिमा सनाच्या गालावर किस करत आहे, तर फातिमा सेल्फी घेत आहे. दोघांचे एकमेकांशी असलेले बाँडिंग दिसून येत आहे. 

बिकिनीमधील तिचे बरेचसे फोटो शेअर करत आयराने कॅप्शनमध्ये लिहिले- 'जर माझ्या वाढदिवसाच्या फोटोवर ट्रोल करून झालं असेल तर हे पाहा आणखी फोटो' आयराने तिच्या ट्रोलर्सना ज्या प्रकारे चोख प्रत्युत्तर दिले ते पाहून बरेच लोक प्रभावित झाले आहेत. 

Read More