Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमित शाह करणार 'पीएम मोदी'च्या नव्या पोस्टरचं अनावरण

'पंतप्रधान नरेंद्र मोदी' सिनेमातील दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे

अमित शाह करणार 'पीएम मोदी'च्या नव्या पोस्टरचं अनावरण

मुंबई : 2019 मध्ये कलाविश्वात थोर व्यक्तिंचे बायोपिक तयार करण्याचे सत्र सुरु आहे. बायोपिकच्या माध्यमातून थोर व्यक्तिंच्या यशोगाथेवर प्रकाश टाकण्यात येत आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' सिनेमातील दुसरे पोस्टर सोमवारी प्रदर्शित करण्यात येणार आहे आणि या नवीन पोस्टरचे अनावरण खुद्द भाजपा अध्यक्ष अमित शहा करणार आहेत. १२ एप्रिल रोजी देशभरातील सिनेमागृहात सिनेमा दाखल होणार आहे. 

सिनेमा गुजरातच्या वेग-वेगळ्या भागांमध्ये चित्रीत करण्यात आला आहे. सिनेमात दर्शन कुमार, बोमन ईरानी, जरीना वहाब, मनोज जोशी, प्रशांत नारायण, बरखा बिष्ट सेनगुप्ता, अक्षत आर सलूजा, अंजन श्रीवास्तव, राजेंद्र गुप्ता आणि यतिन कर्येकर यांसारखे दिग्गज कलाकार मोठ्या पद्यावर दिसणार आहेत. सिनेमा विवेक ऑबेरॉय आणि ओमंग कुमार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. 

सिनेमात पंतप्रधान मोदींची व्यक्तिरेखा अभिनेता विवेक ओबेरॉय साकारणार आहे. या सिनेमाचे निर्माते आनंद पंडीत यांच्या मते 'पंतप्रधान नरेंद्र मोदी' हा सिनेमा आमच्या टीमसाठी सन्माची गोष्ट असल्याचे सांगत आहेत. विवेक म्हणतो, 'आनंद पंडीत एक अनुभवी निर्माते आहेत. त्यांनी अनेक दर्जेदार सिनेमांमधअये काम केले आहे.'  

Read More