Marathi News> मनोरंजन
Advertisement

Amitabh Bachchan यांना रेखाची 'ही' सवय खटकायची; रेखांनी खाल्ला होता बिग बींचा ओरडा

या दोघांमध्ये इतकं प्रेम असूनही अमिताभ हे रेखाला सगळ्यांसमोर ओरडले होते. 

Amitabh Bachchan यांना रेखाची 'ही' सवय खटकायची; रेखांनी खाल्ला होता बिग बींचा ओरडा

Rekha and Amitabh Bachchan : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपण अनेक लव्हस्टोरी (Lovestory) पाहिल्या आहेत. सैफ अली खान (Saif Ali Khan)- करिना कपूर (Kareena Kapoor), अजय देवगन (Ajay Devgn) - काजोल (Kajol), अक्षय कुमार (Akshay kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle khanna)...पण बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत आणि गाजलेली लव्हस्टोरी म्हणजे महानायक अमिताभ (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची...या लव्हबर्डबद्दल अनेक पिढ्यांनी ऐकलं आहे. आजही त्यांचा प्रेमकहाणीचे अनेक किस्से ऐकले जातात. आताच्या पिढीलाही अमिताभ आणि रेखाच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडतं. 

अमिताभ बच्चन आणि रेखा यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले तेव्हा त्यांच्या आयुष्याला कोणते वळण मिळणार आहे हे त्यांना फारसे माहिती नव्हते. या दोघांमधील केमिस्टरी पाहून चाहत्यांनी त्यांनी लग्न करावे असं वाटायला लागलं होतं. असं म्हटलं जातं त्यांची लव्हस्टोरी सुरु पण होती. त्यांचा लव्हस्टोरीमध्ये एक किस्सा आहे, या दोघांमध्ये इतकं प्रेम असूनही अमिताभ हे रेखाला सगळ्यांसमोर ओरडले होते. (amitabh bachchan angry on rekhas habbits nmp)

काय घडलं होतं नेमकं?

किस्सा आहे दो अंजाने या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळीचा...हा चित्रपट रेखा आणि अमिताभ यांचा पहिला चित्रपट होता. तर झालं असं की,अमिताभ चित्रपटाच्या शूटिंगसाठी वेळेवर पोहोचत असत, तर रेखा अनेकदा शूटिंगला उशिरा पोहोचत होत्या. हे रोजच व्हायचं आणि अमिताभ बच्चन यांना रेखा यांची ही सवय अजिबात आवडत नव्हती. शेवटी जेव्हा त्याचा संयम सुटला तेव्हा बिग बी यांनी स्वत: रेखाशी याबद्दल बोलून तिला स्पष्टपणे सांगितले की तिने शूटिंगसाठी वेळेवर यावं आणि काम गांभीर्याने करावं.

अशी रेखा यांची प्रतिक्रिया 

त्याचवेळी जेव्हा रेखाने अमिताभ बच्चन यांच्या तोंडून हे ऐकले तेव्हा ती स्तब्ध झाली, खरं तर ही पहिलीच वेळ होती जेव्हा एका कॉस्टरने तिला वेळेचे महत्त्व सांगितले होते. त्यामुळे ती आश्चर्यचकित झाली पण खूप प्रभावित झाली. अखेर रेखाने अमिताभने शिकवलेला हा धडा स्वीकारला आणि त्यानंतर ती नेहमी सेटवर वेळेवर येऊ लागली.

Read More