Marathi News> मनोरंजन
Advertisement

'रेखा यांच्यासोबत...', अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स वाढवण्याची ट्रिक विचारताच नेटकऱ्याने दिलं उत्तर

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांकडे मागितला सल्ला, तर नेटकऱ्यांनी रेखा यांचा उल्लेख करत दिला सल्ला

'रेखा यांच्यासोबत...', अमिताभ बच्चन यांनी फॉलोअर्स वाढवण्याची ट्रिक विचारताच नेटकऱ्याने दिलं उत्तर

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे फक्त त्यांच्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेच असतात. ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. इतकंच नाही तर त्यांचे आणि चाहत्यांशी सोशल मीडियावर संपर्कात राहतात. त्यांच्या ब्लॉग्सच्या मदतीनं रोजच्या आयुष्याविषयी सांगताना दिसतात. आता अमिताभ यांनी असं काही केलं ज्यामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आधिच्या ट्विटर अर्थात आताच्या X अकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये अमिताभ म्हणाले की 'एक्सवर ते त्यांचे फॉलोवर्स कसे वाढवू शकतात. अमिताभ म्हणाले,  T 5347 - खूप प्रयत्न करतोय, पण ही 49 लाख फॉलोवर्सची संख्या वाढतच नाहीये. काही उपाय असेल तर सांगा.' 

अनेक नेटकऱ्यांनी त्यांना ग्रोकविषयी सांगितलं की एलन मस्कची एक एआय कंपनी xAI एआय चॅटबॉट आहे. त्याला विचारून प्रयत्न करा. या सगळ्यात, त्यांचे अनेक चाहते मजेशीर कमेंट्स करतात. एकानं उत्तर दिलं की 'तुमचे फॉलोवर्स आधीच ऑस्ट्रेलियाच्या जनसंख्येपेक्षा जास्त आहेत. तुम्ही जर म्हणाल तर तिथून कांगारू मागवूण घेऊ पण हे सगळं होणार नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'रेखा जींसोबत एक सेल्फी शेअर करा.' तिसरा नेटकरी म्हणाला, जया बच्चन यांच्यासोफट एक फोटो शेअर करा. तर याशिवाय नेटकऱ्यांनी हा देखील सल्ला दिला की एक ब्लॉकबस्टर चित्रपट करायला हवा किंला एक पॉडकास्ट करायला हवा. ज्यामुळे त्यांचे फॉलोवर्स वाढतील. 
 

fallbacks

हेही वाचा : 'तुझ्या घरात घुसून मारू, कार बॉम्बने उडवू!' अभिनेता सलमान खानला नव्याने धमकी

या सगळ्यात अमिताभ यांनी रविवारी त्यांच्या चाहत्यांसोबत काही फोटो देखील शेअर केले. सिद्धिविनायक आणि बाबुलनाथ मंदिरात जाऊन त्यांनी आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी सांगितले. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शन दिलं की सकाळी सिद्धिविनायकमध्ये गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला. माझ्या खांद्यावर त्यांनी आशीर्वाद दिला आणि बाबुलनाथ मंदिरात देखील त्यांनी आशीर्वाद घेतला. निरोगी राहा, असेच संपर्कात राहा आणि कायम प्रार्थांनामध्ये राहा. अमिताभ यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं झालं तर ते सगळ्यात शेवटी 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. 

Read More