Marathi News> मनोरंजन
Advertisement

55 दाखल झाल्या, सगळी संपत्ती जप्त झाली अन्...; अमिताभ बच्चन यांच्यासोबत नेमकं घडलेलं काय?

Amitabh Bachchan 55 Legal Cases: अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या संपूर्ण प्रसंगाविषयी सांगितलं आहे. 

55 दाखल झाल्या, सगळी संपत्ती जप्त झाली अन्...; अमिताभ बच्चन यांच्यासोबत नेमकं घडलेलं काय?

Amitabh Bachchan 55 Legal Cases: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आज लग्झरी आयुष्य जगत आहेत. त्यांच्याकडे आज सगळं असलं तरी सुद्धा त्यांच्यावर देखील कधी काळी वाईट परिस्थिती आली होती. एकवेळ अशी आली होती जेव्हा त्यांना वाटलं की त्यांचं करिअर आता संपणार आहे. 1990 च्या दशकात स्वत: आर्थिकरित्या त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. अनेक कायदेशीर लढाया ते त्यावेळी लढत होते. त्याचवेळी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्द ही बुडत असल्याचं दिसून आलं. त्यावेळी नेमकं काय झालं होतं त्याविषयी जाणून घेऊया...

अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. त्यात बिग बी वीर सांघवीच्या मुलाखतीत त्यांच्या त्या काळाविषयी सांगताना दिसले जेव्हा त्यांनी खूप कष्ट केलं. त्यावेळी  अमिताभ यांना विचारण्यात आलं की खरंच आहे की त्यांचं घर जप्त करण्यात येऊ शकत होतं आणि तर त्यांनी सांगितलं की संपूर्ण प्रॉपर्टी ही सीज झाली होती. त्यांना 90 कोटी द्यायचे होते आणि त्यांच्यावर जवळपास 55 लीगल केस दाखल झाल्या होत्या. 

याविषयी सांगताना अमिताभ बच्चन म्हणाले, घराच्या दरवाज्यावर कर्जदार उभे रहायचे आणि त्यांच्यासाठी हे फार लाजिरवानं आणि अपमानास्पद होतं. त्याचं कारण म्हणजे त्यांची कंपनी ABCL ही बंद झाली होती आणि दुसरीकडे त्यांचं अभिनय क्षेत्रातील करिअर देखील ढासळू लागलं. त्यांनी सांगितलं की जेव्हा एकीकडे तुमच्यासोबत काही वाईट होतं तेव्हा आजुबाजूला देखील तसचं सुरु होतं. लोकांचा तुमच्यावर विश्वास राहत नाही. त्यांना तुमचा चेहरा देखील पाहायचा नसतो. 

पुढे याविषयी सांगत अमिताभ म्हणाले की लोकांना वाटतं की तुम्ही एक कलाकार नाही आहात किंवा तुम्ही जे चित्रपट करत आहात ते पाहण्यासारखे नाही. लोकांना वाटतं की तुम्ही ज्या प्रकारे कपडे परिधान करता, जसे तुम्ही दिसता, ते योग्य नाही. सगळं काही वाईट होऊ लागतं. कारण जर आयुष्यात काही चुकीचं झालं तर प्रत्येक व्यक्ती हेच बोलू लागतो की तुमचं सगळं संपलय. 

हेही वाचा : 'अंखियों से गोली मारे' वर गोविंदाचा मुलाचा आणि रवीनाच्या लेकीचा VIDEO; पाहताच नेटकरी म्हणाले...

अमिताभ बच्चन यांनी यातून स्वत: ला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. टीव्हीचं होता, ज्यानं त्यांना एक वेगळी संधी आणि आयुष्य दिलं. त्यांना 'कौन बनेगा करोडपती' हा शो मिळाला. तर त्या शोचे ते गेल्या 16 वर्षांपासून ते सुत्रसंचालन करत आहेत. हा शो इतका हिट झाला की त्यांचं करिअर पुन्हा वर आलं. त्यांना करिअरमध्ये एक वेगळी ओळख मिळाली. त्यानंतर एक असा काळ आला की इंडियन सिनेमामध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारे अभिनेते ठरले. 

Read More