Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Cyber Crime Callertune बंद करा' म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकले अमिताभ! रागात म्हणाले, 'सरकारला...'

Amitabh Bachchan Hits Back Trolls: अमिताभ हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांना अनेकजण ट्रोल करतात. मात्र हल्ली अमिताभही ट्रोलर्सला जशास तसं उत्तर देऊ लागलेत. असाच एक प्रकार नुकताच घडला.

'Cyber Crime Callertune बंद करा' म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकले अमिताभ! रागात म्हणाले, 'सरकारला...'

Amitabh Bachchan Hits Back Trolls: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. सध्या अमिताभ बच्चन यांच्या रडारवर त्यांचे ट्रोलर्स असून ते कोणालाही सहज माफ करण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीयेत. यापूर्वी कधीही ट्रोलर्सना उत्तर न देणारे अभिताभ आजकाल सोशल मीडियावर त्यांचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. ट्रोलिंग करणाऱ्यांना अमिताभ त्यांच्याच भाषेत आणि थेट उत्तरं देत आहेत. अलिकडेच त्यांनी त्यांच्या आवाजातील व्हायरल कॉलरट्यूनसाठी ट्रोल करणाऱ्याची बोलती बंद केल्याचं पाहायला मिळालं.

अनेकांनी कॉलरट्यूनसंदर्भात केलीये तक्रार

ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो की, अमिताभ यांची व्हायरल कॉलरट्यून ही देशातील प्रत्येक व्यक्तीने एखाद्याला फोन केल्यानंतर रिंग वाजण्याआधी ऐकू येते. नागरिकांना सायबर गुन्हे आणि फसवणुकीबद्दल जागरूक करणारा एक प्रीरेकॉर्ड केलेला संदेश सरकारकडून बंधनकारक करण्यात आल्यामुळे प्ले केला जातो. मात्र हा प्रकार मागील अनेक महिन्यांपासून सुरु असून आता इंटरनेटवर यासंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. आता हा प्रकार पुन्हा पुन्हा तोच तोचपणा असल्यासारखा आहे. अनेकांनी आणीबाणीच्या वेळी आणि आपत्कालीन कॉल करायचा असेल तर आधी हे ऐकत बसावं लागत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना हा प्रकार त्रासदायक ठरू शकतो असं परखड मत मांडलंय.

अमिताभ यांच्या पोस्टवर एकाने मांडला कॉलरट्यूनसंदर्भातील मुद्दा अन् मग...

सोमवारी, अमिताभ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सहज एक ट्विट केले. "जी हाँ हुजूर, मैं भी एक प्रशंसक हूं... तो??" अशी पोस्ट अमिताभ यांनी केलेली. या पोस्टवर एका युझरने अभिनेत्याला ट्रोल करण्यासाठी रिप्लाय दिला. "तो फोन पे बोलना बंद करो भाई," असं हा युझर म्हणाला. मात्र सध्या अमिताभ ज्या मूडमध्ये आहेत त्यानुसार ते आता गप्प बसणाऱ्यांमधले राहिलेले नाहीत. बिग बींनी देखील कॉलरट्यूनसंदर्भात घेतल्या जाणाऱ्या या सातत्याच्या आक्षेपाची चर्चा कायमची थांबवण्याचा निर्णय घेत खोचक रिप्लाय केला. "भावा, सरकारला सांगा, त्यांनी आम्हाला जे करायला सांगितले ते केले," असं उत्तम अमिताभ यांनी दिलं.

fallbacks

मरणाबद्दल बोलणाऱ्याला टोला

मध्यंतरी एका ट्रोलरने अमिताभ यांना वेळेत झोपत जा नाहीतर दिर्घायुष्य लाभणार नाही, असा सल्ला दिला होता. यावरही अमिताभ यांनी रिप्लाय केलेला. "माझ्या मरणासंदर्भात भाष्य केल्याबद्दल धन्यवाद, ही ईश्वराची कृपा आहे," असं अमिताभ या पोस्टला रिप्लाय करता म्हणालेले. ही पोस्टही चांगलीच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालेलं.

Read More