Marathi News> मनोरंजन
Advertisement

इतर कोणासाठी आजपर्यंत जे केलं नाही ते बिग बी अमिताभ बच्चन यांनी नागराजसाठी केलं...

'माझ्यावर खर्च करण्यापेक्षा...' झुंड सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिग बींनी जे केलं ते वाचून तुम्हीही म्हणाल 'महान नायक'

इतर कोणासाठी आजपर्यंत जे केलं नाही ते बिग बी अमिताभ बच्चन यांनी नागराजसाठी केलं...

मुंबई : झुंड सिनेमाची प्रतीक्षा सर्वांनाच आहे. बिग बींसोबत स्टार कलाकार आणि नागराज मंजुळे यांनी मांडलेली कथा पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. बिग बी यांनी झुंड सिनेमाच्या शूटिंग दरम्यान नागराजसाठी जे केल ते यापूर्वी कधीच कोणासाठी केल नसावं. पुन्हा एकदा बिग बी यांचा मोठेपणा दिसला. 

बिग बी अमिताभ बच्चन यांची महानता पुन्हा एकदा समोर आली आहे. अमिताभ झुंड सिनेमामध्ये फुटबॉल कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मुलांना बदलण्यासाठी आणि त्यांना उत्तम प्रशिक्षण देणार अशी त्यांची या सिनेमातील भूमिका असणार आहे. 

सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना भावुक करणारा आहे. अमिताभ बच्चन यांना या सिनेमाबद्दल पूर्ण विश्वास होता. त्यामुळे जेव्हा सिनेमा अडचणीत सापडला अडचणी आल्या तेव्हा त्यांनी मोठ्या मनानं आपलं मानधन कमी केलं. त्यांचा हा मोठेपणा पाहून त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनीही आपलं मानधन कमी केलं. याबाबत सिनेमाचे निर्माता संदीप सिंह यांनी खुलासा केला. 

अभिताभ बच्चन यांना झुंड सिनेमाची स्क्रिप्ट खूप जास्त आवडली. सिनेमाचं बजेट जास्त नव्हतं याची कल्पना त्यांना होती. अडचण समजून त्यांनी आपलं मानधन कमी केलं. अमिताभ म्हणाले की माझ्या मानधनावर जास्त खर्च करण्यापेक्षा सिनेमावर खर्च करा. याबाबत स्वत: निर्मात्याने पुढे येऊन माहिती दिली. अमिताभ यांनी आपल्या कृतीतून ते महान नायक असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. 

Read More