Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र

बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

व्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. 

तब्बल २७ वर्षानंतर ही जोडी एकत्र टीव्हीवर येणार असल्यानं या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यात या ट्रेलरनं आणखीनच भर घातलीय. 

'अमर अकबर अॅन्थनी' सिनेमात एकमेकांचे भाऊ-भाऊ दिसलेले दोन कलाकार या सिनेमात बाप-मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन ऋषि कपूर यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

ही कहाणी अशा एका बाप-मुलाची आहे, ज्यामध्ये १०२ वर्षांचा तरुण बाप जीवनाप्रति खूपच सकारात्मक आहे तर त्याचा म्हातारा मुलगा मात्र नकारात्मक दिसतोय. 'ओह माय गॉड'चा दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या सिनेमाच्या निमित्तानं अमिताभ-ऋषी यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणलीय. 

'मैं दुनिया का पहला ऐसा बाप होंगा, जो अपने बेटे को वृद्धाश्रम भेजेगा' म्हणणारा बाप या ट्रेलरमध्ये भलताच भाव खाऊन जातोय. हा सिनेमा येत्या ४ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Read More