Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ यांनी जवळ घेताच जया बच्चनच्या डोळ्यात का आलं पाणी?

बिग बी अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात.

अमिताभ यांनी जवळ घेताच जया बच्चनच्या डोळ्यात का आलं पाणी?

मुंबई : बिग बी अर्थात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर खूपच सक्रिय असतात. त्यांनी शेअर केलेली प्रत्येक पोस्ट चर्चेत असते. अनेक गोड मुव्हमेंट बिग बी शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. नुकतच अमिताभ यांनी पत्नी जया बच्चन यांच्यासोबतच्या पहिल्या  'बंसी बिरजू' चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे.

दोघांची जोडी आजही प्रेक्षकांना खूप आवडते. एकेकाळी या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा पहिला चित्रपट 'बंसी बिरजू'ला  प्रदर्शित होऊन 49 वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने बिग बींनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. बिग बींनी जया बच्चन यांच्यासोबतचा रोमॅन्टिक फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा आणि जया बच्चन यांचा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आमचा पहिला चित्रपट ‘बंसी बिरजू’ 1 सप्टेंबर, 1970 ला प्रदर्शित झाला होता. ही 49 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे."

बिग बींच्या या पोस्टला त्यांच्या चाहत्यांनी खूप चांगली पसंती दिली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Read More