Marathi News> मनोरंजन
Advertisement

'एका दिवसात 200 सिगरेट, मांसाहार अन् मद्यापन...'; अमिताभ यांनी स्वत: केला होता त्यांच्या सवयींचा खुलासा

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी एका मुलाखतीत त्यांच्या या सवयींविषयी खुलासा केला होता. 

'एका दिवसात 200 सिगरेट, मांसाहार अन् मद्यापन...';  अमिताभ यांनी स्वत: केला होता त्यांच्या सवयींचा खुलासा

Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यांची फॅन फॉलोइंड खूप जास्त आहे. अमिताभ बच्चन यांची प्रतिमा ही एका सज्जन पुरुषाची आहे. ना ते मद्यपान करतात ना सिगरेट पितात. पण नेहमीच असं होत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा ते खूप मद्यपान करायचे. सिगरेट प्यायचे आणि मांसाहार करायचे. त्याचा खुलासा स्वत: अमिताभ बच्चन यांनी केला आहे. 

200 सिगरेट अन् मद्यपान करायचे अमिताभ बच्चन

एका मुलाखतीत याविषयी खुलासा करत बिग बींनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी या सगळ्या सवयी सोडल्या. फक्त अमिताभ नाही तर त्यांची आई तेजी बच्चन आणि पत्नी जया बच्चन देखील मांसाहार करायच्या. अमिताभ यांनी सांगितलं की 'मी स्मोक करत नाही, मद्यपान करत नाही आणि मीट खात नाही. त्याचा धर्माशी काही संबंध नाही. चव महत्त्वाची आहे. माझ्या कुटुंबात माझे वडील शाकाहारी होते आणि आई मांसाहारी. असंच जया खाते आणि मी नाही. मी आधी मांसाहार करायचो आणि मद्यपान आणि सिगरेट देखील फुकायचो, पण आता सगळं सोडलंय. कोलकातामध्ये एक दिवसात 200 सिगरेट प्यायचो. हे सत्य आहे 200. मात्र, मुंबईत आल्यानंतर मी सोडलं. मी मद्यपान देखील करायचो आणि काहीही प्यायचो. जे दिसेल ते प्यायचो, पण काही वर्षांपूर्वी मी ठरवलं की मला याची गरज नाही. माझ्या सवयींशी मला काही त्रास होत नाही, परदेशात शाकाहारी जेवण शोधणं फार कठीण आहे त्यामुळे जर मी परदेशात शूट करत नसेल तर मी शाकाहारी जेवतो.'

हिंसक झाले होते अमिताभ

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शांत स्वभावाला घेऊन एक वक्तव्य केलं आहे आणि सांगितलं की, 'एक वेळ होती जेव्हा त्यांना खूप राग यायचा. मला वाटत नव्हतं की मी स्वत: एक हिंसक व्यक्ती आहे. मी माझ्यावरचा ताबा कधी गमावत नाही. कॉलेजमध्ये असताना काही वेळा भांडलोय पण तितकंच.'

हेही वाचा : अभिनेते जितेंद्र यांनी तब्बल 855 कोटींना विकली मुंबईतील जमीन, बालाजी IT पार्कच्या जागी आता तिथे...

अमिताभ बच्चन हे एक पार्टी अ‍ॅनिमल होते आणि त्यांच्या काही सवयींविषयी ‘सत्ते पे सत्ता’ मध्ये त्यांच्यासोबत काम करणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांनी खुलासा केला होता. रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की 'रात्रभर अमिताभ हे पार्टी करायचे आणि जया बच्चन त्यांना शोधत राहायच्या.' 

Read More