Marathi News> मनोरंजन
Advertisement

37 मिलियन फॉलोअर्स तरीही अमिताभ बच्चन यांना चालवता येत नाही इन्स्टाग्राम, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

अमिताभ बच्चन हे वयाच्या 82 व्या वर्षीही सोशल मीडियावर सक्रिय आहेत. मात्र, यावेळी ते इन्स्टाग्राम कसे वापरायचे हेच विसरले असून, त्यांनी यावर हलक्याफुलक्या अंदाजात एक व्हिडीओही शेअर केला आहे. पाहूयात नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये? 

37 मिलियन फॉलोअर्स तरीही अमिताभ बच्चन यांना चालवता येत नाही इन्स्टाग्राम, व्हिडीओ शेअर करत म्हणाले...

Amitabh Bachchan: बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन हे वयाच्या 82 व्या वर्षीही सोशल मीडियावर तितकेच सक्रिय आहेत जितके आजचे तरुण स्टार्स आहेत. ब्लॉग लिहिणे, X वर विनोदी पोस्ट शेअर करणे तसेच चाहत्यांशी थेट संवाद साधणे - या सर्व गोष्टी ते नियमितपणे करतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टमध्ये चाहत्यांना एक वेगळीच शैली आणि अनुभव दिसून येतो.

अलीकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक छोटासा, पण मजेशिर व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की ते इन्स्टाग्राम वापरण्याचे फिचर्स विसरले आहेत आणि आता पुन्हा शिकत आहेत. व्हिडीओ शेअर करत त्यांनी हसत म्हटले, 'मी इन्स्टाग्राम वापरायला शिकत आहे... आशा आहे की हे योग्यरित्या काम करेल.' हा हलकाफुलका अंदाज पाहून चाहत्यांनीही कमेंट्समध्ये प्रेमाचा वर्षाव केला आणि त्यांची खिल्ली उडवण्याऐवजी त्यांचं कौतुक केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आपल्या ब्लॉगमध्येही त्यांनी या अनुभवाचा उल्लेख करत लिहिले, 'काल मी काहीतरी नवीन शिकण्याबद्दल बोललो होतो आणि आज ते प्रत्यक्षात करून पाहिले. पण आता पुन्हा विसरलो आहे... चला उद्या पुन्हा प्रयत्न करूया.' त्यांच्या या वाक्यांतून स्पष्ट होते की वय काहीही असो, शिकण्याची इच्छा जर मनात असेल तर जीवन नेहमी ताजंतवानं राहू शकतं. अमिताभ बच्चन यांना वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले राहणे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. ते आपल्या चाहत्यांना 'कुटुंब' म्हणतात आणि आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक अनुभव त्यांच्यासोबत शेअर करतात. त्यांचा ठाम विश्वास आहे की प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो आणि ते शिकण्याचा अनुभव आयुष्यभर आपल्याला पुढे नेत राहतो. त्यांच्या पोस्टमधील अजून एक खास बाब म्हणजे त्यांची अनोखी ट्विट करण्याची पद्धत. प्रत्येक ट्विटच्या आधी ते एक क्रमांक लिहितात, ज्याचा वेगळा अर्थ असतो. कधी कधी या पद्धतीमुळे त्यांना ट्रोलही केलं जातं, पण त्यावर ते नेहमीच हसतमुख प्रतिक्रिया देतात.

हे ही वाचा: व्यावसायिक पतीसोबत लग्न करण्यासाठी 'या' अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, 1300 कोटी बँक बॅलन्स आणि 12000 कोटींची उलाढाल

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या लोकप्रिय क्विझ शो 'कौन बनेगा करोडपती' च्या नव्या सीझनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा शो ब्रिटीश गेम शो 'हू वॉन्ट्स टू बी अ मिलियनेअर' वर आधारित आहे आणि त्यातही त्यांची ऊर्जा पाहून प्रेक्षक थक्क होतात. त्यांच्या या शिकण्याच्या प्रवासावरून स्पष्ट होते की वय ही फक्त एक संख्या आहे; जिज्ञासा आणि शिकण्याची ओढ असेल तर कोणत्याही वयात नवं काहीतरी आत्मसात करता येतं. त्यामुळेच चाहते त्यांना आजही "सुपरस्टार" म्हणतात आणि त्यांच्या प्रत्येक कृतीकडे उत्सुकतेने पाहतात.

Read More