Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका

अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. 

अमिताभ बच्चन 'या' मराठी चित्रपटात साकारणार भूमिका

मुंबई : अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर हिंदी सिनेसृष्टीचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आता आपला मोर्चा मराठी चित्रपटाकडे वळवणार आहेत. मराठी कलाविश्वातील दिग्गज कलाकार आणि रंगमंच गाजवणारे विक्रम गोखले यांच्या आगामी चित्रपटात बिग बी दिसणार आहेत. गोखलेंच्या चित्रपटात बिग बी पाहुणा कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहेत. अनेक चित्रपटांच्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या बच्चन यांनी त्यांच्या ७६ ब्लॉगच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. 

अमिताभ बच्चन सध्या नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे 'गुलाबो सिताबो', 'चेहरे' या चित्रपटांमध्ये काम करत आहे. 

बीग बिनीं सांगितल्यानुसार, 'सध्या मी विक्रम गोखलेंच्या चित्रपटात पाहुणा कलाकाराची भूमिका साकारणार आहे. त्याचप्रमाणे 'झुंड' चित्रपटाच्या चित्रिकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे.'

'अग्निपथ', 'खुदा गवाह' अशा दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिताभ बच्चन आणि विक्रम गोखले या कलाकारांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती.

Read More