Marathi News> मनोरंजन
Advertisement

बिग बींचा सर्वात मोठा चाहता, करतो हे काम...

महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

बिग बींचा सर्वात मोठा चाहता, करतो हे काम...

रतलाम : संपूर्ण जगात महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. वाढदिवसा निमित्त त्यांच्या एका चाहत्याने चक्क आईसक्रीमचे मोफत वाटप केले आहे. रतलाममध्ये राहणाऱ्या या चाहत्याचे नाव रमेशचंद्र गौड असे आहे. रमेशचंद्र पूर्णपणे बीग बींना फॉलो करतात. आईसक्रीम विकून ते त्यांच्या कुंटुंबाचे पालन करतात. 

बिग बींच्या स्टायलने ते दिवसभर आईसक्रीम विकत असतात. परंतु महानायकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी लहानमुलांचे मनोरंजन करून मोफत आईसक्रीमचे वाटप केले. कधी ते बीग बींचे डायलॉग बोलतात, तर कधी त्यांच्या  प्रसिद्ध गाण्यावर ताल धरून जमलेल्यांचे मनोरंजक करतात. 

त्यांना त्याठिकाणी डॉन म्हणून देखील जाते. रतलामचा हा डॉन बिग बींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा फोटो लावून केक देखील कट करतो. डॉनने त्याच्या आईसक्रीमच्या गाडीवर बिग बींचे फोटो देखील लावले आहेत. 

बीग बींचा हा चाहता अनेक वेळा त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. पण त्याला बिग बींना काही भेटता आले नाही. 

Read More