Marathi News> मनोरंजन
Advertisement

'Amma Dekh' गाण्याच्या नव्या व्हर्जनची धूम

बॉलिवूड सिनेमा 'नवाबजादे' चे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे.

'Amma Dekh' गाण्याच्या नव्या व्हर्जनची धूम

मुंबई : बॉलिवूड सिनेमा 'नवाबजादे' चे नवे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'अम्मा देख' या गाण्याने प्रदर्शनाबरोबरच युट्युबवर धमाल केली. हे गाणे इतके लोकप्रिय झाले की, आतापर्यंत ६८ लाख लोकांनी ते पाहिले आहे. तसंच युट्युबवर हे गाणे चौथ्या नंबरवर ट्रेंड करत आहे. १९९४ मध्ये आलेल्या जॅकी श्रॉफचा सिनेमा स्टंटमॅन मधील अम्मा देख हे गाणे रिक्रिएट करण्यात आले. या गाण्याचे ओरीजनल व्हर्जन जॅकी श्रॉफवर चित्रित करण्यात आले होते आणि बाली ब्रह्मभट्ट ने हे गाणे गायले होते.

नवाबजादे सिनेमातील या गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये राघव जुयाल, पुनीत पाठक आणि धर्मेश दिसत आहेत. तर 'डान्स इंडिया डान्स २' ची विजेती शक्ती मोहनने या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे. प्रदर्शनाबरोबरच या गाण्याला रसिकांनी डोक्यावर घेतले.

रॅपिंग हे या गाण्याचे वैशिष्ट्य आहे. गुरिंदर सेगर उर्फ सरदारजी आणि सुकृती काकर यांनी हे गाणे गायले असून सरदारजीने गाणे संगीतबद्ध केले आहे. गाण्यात रॅपिंगसाठी प्रसिद्ध स्टार इक्काने जबरदस्त काम केले आहे.
'नवाबजादे' सिनेमाचे दिग्दर्शन जयेश प्रधानने केले आहे. या सिनेमाचे दुसरे गाणे 'तेरे नाल नचना' हे देखील सध्या चांगलेच चर्चेत आहे. या प्रसिद्ध रॅपर बादशाहने या गाण्याला आवाज दिला आहे. याशिवाय बादशाहचे अलिकडेच एक गाणे प्रदर्शित झाले. 

 

Oh la la la la la la la la la la 

A post shared by Shakti Mohan (@mohanshakti) on

Read More