Marathi News> मनोरंजन
Advertisement

... जर साराने असं केलं तर तिची धुलाईच होईल,साराच्या आईचं उत्तर

अमृता सिंहने केला मोठा खुलासा 

... जर साराने असं केलं तर तिची धुलाईच होईल,साराच्या आईचं उत्तर

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amrita Singh) यांची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री सारा आपल्या आईच्या अगदी जवळ आहे. सारा लहान असल्यापासूनच अमृता सिंह तिची जास्त काळजी घेते. अमृताने सैफशी लग्न केलं तेव्हा तो अवघ्या 20 वर्षांचा होता. एका मुलाखती दरम्यान अमृताने साराबाबत महत्वाचा खुलासा केला होता. 

जर माझ्या मुलीने असं काही केलं तर 

अमृता आणि सैफ काही वर्षांपूर्वी सिमी ग्रेवालच्या चॅट शोमध्ये गेले होते. त्यावेळी सिमी यांनी अमृताला एक प्रश्न विचारला होता. प्रश्न असा होता की, जर तुमच्या मुलीने देखील कमी वयात लग्न केलं तर? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता अमृताने उत्तर दिलं होतं की,'मी माझ्या मुलीला फटकवेन, हे अगदी नक्की आहे.'

अमृता आणि सैफने 1991 साली लग्न केलं. तेव्हा अमृता सैफपेक्षा 13 वर्षांनी मोठी होती. तेव्हा सैफ 20 वर्षांचा आणि अमृता 33 वर्षांची होती. सैफ आणि अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. 

अमृताने मुलाखतीत केला मोठा खुलासा 

मुलाखतीत अमृताने आणखी एक खुलासा केला. आपण खूप घाई गडबडीत लग्न केल्याचं अमृताने कबुल केलं होतं. त्यांच्या लग्नानंतर सैफची आई ज्येष्ठ अभिनेता शर्मिला टागोर या खूप रिऍक्ट झाल्या होत्या.  यानंतर सैफ आणि अमृता यांच्यावर अनेक जण नाराज होते. 

Read More