Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेक्षकांच्या भेटीला नवं गाणं

अमृता फडणवीस यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस (Amruta fadnavis New Song Andhaar) यांचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर लाँच झालं आहे. 'डाव' सिनेमातील 'अंधार' असं हे गाणं आहे. 

अभिनेत्री सागरिका घाटगे आणि गुलशन देवैया या जोडीवर चित्रित असलेल्या अंधार सिनेमाचं गाणं आहे. 'डाव' या सस्पेन्स, थ्रिलर अशा धाटणीचा हा सिनेमा आहे. हे गाणं लेखक मंदार चोळकरने लिहिलं असून संगीत जीत गांगुलीचं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन कनिष्क वर्माने केलं आहे. 

सागरिका घाटगेचा हा दुसरा मराठी सिनेमा आहे. या अगोदर सागरिकाने "प्रेमाची गोष्ट' या सिनेमात अभिनेता अतुल कुलकर्णीसोबत काम केलं आहे. तर अभिनेता गुलश देवैया या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून गुलशन मराठी शिकला आहे. 

या अगोदर अमृता फडणवीस यांचं 'हॅलो' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यांनी अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला होता. अमृता यांचं गाण्याचं प्रेमही सर्वश्रृत आहे. त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका सिनेमात गाणं गायलं होतं.

Read More