Marathi News> मनोरंजन
Advertisement

विराट-अनुष्काच्या पोजमध्ये सोनम कपूरसोबत आनंद आहूजाचे फोटो व्हायरल

सोशल मीडियावर सोनमचे मेहेंदीपासून ते लग्नापर्यंतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. 

विराट-अनुष्काच्या पोजमध्ये सोनम कपूरसोबत आनंद आहूजाचे फोटो व्हायरल

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर बॉयफ्रेंड आनंद आहूजासोबत नुकतीच विवाहबंधनात अडकली. त्यामुळे सोशल मीडियावर सोनमचे मेहेंदीपासून ते लग्नापर्यंतचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. पण, त्यात सर्वाधीक बाजी मारली आहे ती, सोनम-आनंदच्या विराट-अनुष्कावाल्या पोजमधील फोटोंनी.

सोनमचा पती आनंदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनमसोबत एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून कमेंटबॉक्समध्ये हरतऱ्हेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एका प्रतिक्रियेत रणवीर सिंहने खूप सारी हार्ट्सची चित्रे पोस्ट करत रिअॅक्शन दिली आहे. तर, सोनमची चुलतबहीन जान्हवीने कपूरने लिहिले आहे की, 'तुम्ही लोक खूपच सुंदर आहात. मला तर, श्वासही घेता येईना.'

... तर, अनेक फॉलोअर्सनी रणवीरला टॅग करत लिहिले आहे की, तू कधी लग्न करतोयस? काही मंडळींनी सोनमच्या या पोटोला विराट-अनुष्काची पोज कॉपी केल्याचे म्हटले आहे.  लक्षवेधी असे की, क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनीही आपल्या विवाहानंतर अशा प्रकारचा फोटो शेअर केला होता. 

 

Read More