Marathi News> मनोरंजन
Advertisement

'दुसऱ्यांच्या लग्नात स्वत:ला विकण्यापेक्षा मला...' अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभांवर बड्या दिग्दर्शकाच्या लेकीची बोचरी टीका

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Festivities : मराठमोळ्या अभिनेत्यानंही स्पष्टच सांगितला अंबानी आणि सामान्यांच्या लग्नातला फरक...

'दुसऱ्यांच्या लग्नात स्वत:ला विकण्यापेक्षा मला...' अनंत अंबानी- राधिका मर्चंटच्या लग्नसमारंभांवर बड्या दिग्दर्शकाच्या लेकीची बोचरी टीका

Anant Ambani-Radhika Merchant's Wedding Festivities : आशिया खंडातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणाऱ्या (Mukesh Ambani) मुकेश अंबानी यांच्या सर्वात धाकट्या केलाचा विवाहसोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या लग्नसोहळ्याआधी विविध कार्यक्रमांचं आयोजन करत अंबानी आणि मर्चंट कुटुंबानं सर्वांच्याच नजरा वळवल्या आहेत. अशा या गडगंज पैसा खर्च करून साजरा केल्या जाणाऱ्या समारंभांवर एका बड्या दिग्दर्शकाच्या मुलीनं बोचरी टीका केली आहे. 

सध्या सुरु असणाऱ्या या न त्या, समारंभ आणि सोहळ्यावर अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप हिनं काहीसा नाराजीचा सूर आळवत या सर्व प्रकाराला 'सर्कस' म्हणून संबोधलं. इतकंच नव्हे, तर आपल्याला आमंत्रण असूनही आपण त्या सोहळ्याला न जाण्याचं ठरवलं असंही आलियानं स्पष्ट केलं. 

'अंबानींचं लग्न हे आता लग्न नसून, या वळणावर ती सर्कस झाली आहे', अशा स्पष्ट शब्दांत तिनं तिच्या इन्स्टाग्राम ब्रॉडकास्ट चॅनलवर म्हटलं. सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो पाहून आपण या कथित श्रीमंत लोकांच्या उत्साहाचा आनंद घेत असल्याचं उपरोधिक वक्तव्य करत तिनं आपण जाणीवपूर्वक या सोहळ्यांसाठी न गेल्याचं म्हटलं. 

'योगायोगानं मलाही आमंत्रण होतं. कारण, ही मंडळी प्रसिद्धी करत आहेत. (??? का, ते मला विचारू नका). मी मात्र नकार दिला. कारण, दुसऱ्याच्या लग्नात स्वत:ला विकण्यापेक्षा मला माझा स्वाभिमान प्रिय आहे.' असं आलियानं लिहिलं. इतक्यावरच न थांबता या सोहळ्यासाठी जस्टिन बिबरला बोलण्याच्या मुद्द्यावरही तिनं कटाक्ष टाकला. आता आपल्याकडे इतका पैसा आहे तर जस्टिन बिबरलाही बोलवूयाच... असा उपरोधिक सूर तिनं आळवला. 

fallbacks

शाळेतला नाच... 

फक्त आलिया कश्यपच नव्हे, तर मराठी कलाजगतात परखड भूमिका मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सौरभ गोखले यानंसुद्धा या धनाढ्य लग्नसोहळ्यावर निशाणा साधला. 

हेसुद्धा वाचा : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी.. अशी झाली दोघांची पहिली भेट

 

'आज एका धनाढ्य कुटुंबातील लग्नसमारंभातील कुटुंबीयांचा नृत्याविष्कार पाहून मला माझ्या छोट्या नुमवि शाळेतील स्नेहसंमेलनातील आमचा नाच आठवला. फरक इतकाच की आम्ही विद्यार्थी होतो आणि त्यांना अर्थ- विद्या उत्तम येते', अशी एक पोस्ट सौरभनं केली होती. 

fallbacks

अनंत आणि राधिका यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्तानं सध्या अंबानी आणि मर्चंट कुटुंबाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. कुटुंबाच्या वतीनं विविध ठिकाणी डोळे दीपतील इतका खर्च करत बहुविध समारंभाचं आयोजन केलं जात आहे. कलाजगतापासून राजकारण आणि क्रीडा क्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रातून अनेक दिग्गजांनी या सोहळ्यांसाठी हजेरी लावली. पण, असं असतानाच काही सेलिब्रिटी मात्र या साऱ्याला अपवाद ठरले. हीच मंडळी आता वेधताना दिसत आहेत. 

Read More