Marathi News> मनोरंजन
Advertisement

कजरारे गाणं वाजताच ऐश्वर्या आणि आराध्याला आवरला नाही मोह; अभिषेकही थिरकला

गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक ही जोडी चर्चेत आहे. हे कपल बॉलिवूडच्या सर्वात चर्चेत असणाऱ्या जोडीपैकी एक आहे.  

कजरारे गाणं वाजताच ऐश्वर्या आणि आराध्याला आवरला नाही मोह; अभिषेकही थिरकला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेकच्या दुरावाच्या बातम्या माध्यमांमध्ये फिरत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे कपल वेगळं झाल्याच्या चर्चा होत्या मात्र पुन्हा एकदा या बातमीने ही अफवा असल्याचं सिद्ध केलं आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात आराध्या ऐश्वर्या आणि अभिषेकने एकत्र हजेरी लावलेली दिसली होती.  एका कार्यक्रमात  अमिताभ बच्चन आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते.

समोर आलेल्या व्हिडीओत ऐश्वर्या आराध्या आणि अभिषेक एकत्र बसलेले दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर या तिघांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. समोर आलेल्या या व्हिडीओत आराध्या तिच्या आईबाबांसोबत  'कजरा रे-कजरा रे'  या गाण्यावर डान्स स्टेप करताना दिसत आहे. या सुपरहिट गाण्यात आराध्यासोबत अभिषेक आणि ऐश्वर्या राय देखील दिसत आहेत. कजरा रे कजरा रे हे गाणं ऐश्वर्या अभिषेक आणि अमिताभ यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हे गाणं त्यावेळी सुपरहिट झालं आहे. 

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ  मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट यांचा प्री-वेडिंग सेलिब्रेशनवेळचा आहे.  १ ते ३ मार्च रोजी गुजरातमधील जामनगर येथे हा लग्नसोहळा शाहीपद्धीतीने पार पडला आहे. अगदी बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या स्टार्सनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.  

कलाकारांच्या लूकविषयी बोलायचं झालं तर, आराध्याने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे. या अनारकली सूटमध्ये आराध्या खूपच मनमोहक दिसत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्याने बेज रंगाचा फ्लोर-लेंथ अनारकली सलवार सूट परिधान केला होता. या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत होती. तर अभिषेकने बेज रंगाचा कुर्ता सेट परिधान केला होता. ज्यामध्ये अभिनेता खूपच हँण्डसम दिसतोय. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओमध्ये हे दिसतंय की, हे कपल हा सोहळा खूपच एन्जॉय करत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंब वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. बऱ्याच दिवसांपासून मीडियामध्ये सातत्याने या कपलच्या दुराव्याच्या बातम्या समोर येत आहेत. बच्चन कुटूंब हे बॉलिवूडमधील सर्वात श्रेष्ठ कुटूंबापैकी एक आहे. नेहमीच हे सपुंर्ण कुटूंबच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं. कधी ते त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात तर कधी ते त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असतात. गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटूंब चर्चेत आहे. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन बॉलिवूडच्या फेमस कपलपैकी एक आहेत. ही जोडी सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय असते. या जोडीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

Read More