Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ananya Pandey च्या बहिणीला फिल्मी अंदाजात बॉयफ्रेण्डकडून प्रपोज

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडे तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

 Ananya Pandey च्या बहिणीला फिल्मी अंदाजात बॉयफ्रेण्डकडून प्रपोज

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडे तिच्या हॉट अंदाजामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलाना पांडे तिचा बॉयफ्रेंड इव्होर मॅकक्रे व्ही सोबत हॉट फोटो शेअर करत असते. आता दोघांनी अगदी फिल्मी स्टाईलमध्ये साखरपुडा केला आहे. 

फिल्मी स्टाईलने प्रपोज 
अलना पांडेने सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाला सांगितले आहे की, ती लवकरच लग्न करणार आहे आणि तिचा साखरपुडा झाला आहे. काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तिने तिच्या चाहत्यांसोबत तो क्षण शेअर केला आहे जेव्हा तिच्या प्रियकराने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. हा सीन एखाद्या बिग बजेट बॉलीवूड चित्रपटातील सीनपेक्षा कमी नव्हता.

समुद्र किनारी केलं प्रपोज 
वास्तविक आपण फोटोंमध्ये स्पष्टपणे पाहू शकतो की, इव्होर मॅकक्रे व्हीने आपल्या प्रेयसीला खूश करण्यासाठी बरीच तयारी केली आहे. समुद्रकिनारी एका सुंदर लोकेशनवर त्याने अगदी हटके लग्नाचा प्रस्ताव  अलाना समोर ठेवला आहे. यासोबतच तो तिला लग्नासाठी होकर देण्यासाठी एका हार्ट शेपच्या मधे अलानासमोर गुडघे टेकून बसलेला दिसतो.

fallbacks

अलानाची भावनिक पोस्ट 

हे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना अलानाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. अलानाने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'मी तुला भेटेपर्यंत दुसऱ्या व्यक्तीवर इतके प्रेम करण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. मला दररोज हसवल्याबद्दल आणि गुदगुल्या केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, या जगात मला तू सर्वांत जास्त आनंदी ठेवतोस. इव्होर मॅकक्रे व्ही मी तुझ्यासोबत कुटुंब सुरु करण्याची प्रतीक्षा करू शकत नाही.

 

Read More