Marathi News> मनोरंजन
Advertisement

रेस ३ च्या सेटवर अनिल कपूर आणि सलमान खानने एकत्र केलं बर्थ डे सेलिब्रेशन

'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील तुफान कामगिरीनंतर सलमान खानचा यंदाचा बर्थ  डे खास झाला आहे.

रेस ३ च्या सेटवर अनिल कपूर आणि सलमान खानने एकत्र केलं बर्थ डे सेलिब्रेशन

मुंबई : 'टायगर जिंदा है' या चित्रपटाच्या बॉक्सऑफिसवरील तुफान कामगिरीनंतर सलमान खानचा यंदाचा बर्थ  डे खास झाला आहे.

उद्या (२७ डिसेंबरला) सलमान खान त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करणार आहे. पण त्याच्या बर्थ डे सेलिब्रेशनला आधीच सुरूवात झाली आहे. 

रेस ३ च्या सेटवर   

सलमान खास 'रेस ३' चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. काल या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान व्यस्त वेळापत्रातून थोडा वेळ काढून दोन वाढदिवस साजरे करण्यात आले आहेत. 

रेस ३ च्या सेटवर सलमान खान आणि अनिल कपूर यांचा वाढदिवस एकत्र साजरा करण्यात आला. रेस च्या सार्‍याच सिक्वेलमध्ये काम करणारे अनिल कपूर यांचा ६१ वा वाढदिवस साजरा केला. आज अनिल कपूर यांनी याबाबत ट्विट केले आहे.  

रेस ३ च्या सेटवर त्यांनी केकही कापला.  सतीश कौशिक यांनी अनिल कपूर यांना शुभेच्छा देताना, वाढदिवसादिवशीदेखील शूटिंग करत आहात याबाबत कौतुक केले. तसेच यंदाच्या वाढदिवसादिवशी नव्या चित्रपटाचे शूटिंग करत असल्याने त्यांना शुभेच्छा दिल्या .  

 

 

अनिल कपूर यांचे ट्विट

अनिल कपूरयांनीदेखील सतीश कौशिक यांना रिप्लाय केला. पार्टी आणि सेलिब्रेशन एकीकडे पण कामातून मिळणारा आनंद दुसरीकडे  असे मत व्यक्त केले आहे.  


रेमो डिसुझा 'रेस ३' चे दिग्दर्शन करणार आहे. २०१८ च्या ईद दिवशी हा चित्रपट रिलीज होणार आहे. रेस च्या सिक्वेलमध्ये सैफ अली खानच्या जागी सलमानची निवड झाली आहे. सलमान खानसोबत जॅकलिन फर्नांडीज, बॉबी देओल, डेजी शाह, साकिब सालीम एकत्र दिसले आहेत.  

Read More