Marathi News> मनोरंजन
Advertisement

या दिग्दर्शकाला डेट करतेय रिया कपूर...

बॉलिवूडमध्ये सध्या विवाहपर्व चालू आहे, असे म्हटले तर वावणे ठरणार नाही. 

या दिग्दर्शकाला डेट करतेय रिया कपूर...

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या विवाहपर्व चालू आहे, असे म्हटले तर वावणे ठरणार नाही. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नंतर नेहा धुपिया आणि मग गायक हिमेश रिशमिया हे अलिकडेच विवाहबद्ध झाले. इतकंच नाही तर अनेक दिवसांपासून बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या चर्चा सुरू आहेत. यातच अजून एका चर्चेला तोंड फुटले आहे.

कपूर कुटुंबात लग्न आणि प्रेमाचा मोसम

कपूर कुटुंबात लग्न आणि प्रेमाचा मोसम आहे. सोनम कपूरचा शाही विवाहसोहळा पार पडल्यानंतर तिची लहान बहिण रिया कपूरच्या अफेअच्या चर्चांना उधाण आले आहे. सोनम कपूरच्या विवाहसोहळ्यात एका व्यक्तीला स्पॉट करण्यात आले. सोनम याच व्यक्तीला डेट करत असल्याच्या बोलले जात आहे. फिल्म निर्माती रिया कपूरच्या तथाकथित बॉयफ्रेंडचे नावा आहे करण बुलानी. रियाचा आतेभाऊ आणि अभिनेता मोहित मारवाहच्या विवाहसोहळ्यात देखील करण बुलानी उपस्थित होता. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत तो रिया आणि सोनम कपूरसोबत दिसत आहे.

रियाच्या अफेअरची चर्चा

सोनम कपूरच्या लग्नाच्या दोन दिवस आधी रिया आणि करणच्या अफेअर्सची खुमखुमी लागली होती. सोनमच्या मेंहदी सोहळ्यात एक व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला. ज्यात रिया कपूर डान्स करत आहे. तो व्हिडिओ करणने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, माय गर्ल.

तसंच त्या दोघांना अनेकदा कॅफे, रेस्टॉरन्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले होते. त्याचबरोबर करण बुलानीचे कपूर कुटुंबियांशीही चांगलीच जवळीक आहे. सोनम कपूर आणि अर्जून कपूरसोबत तो अनेकदा ट्रिपलाही गेला आहे.

करण एक डिरेक्टर आहे. आएशा आणि वेक अप सिड सारख्या सिनेमांत त्याने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय टी.व्ही. शोजच्या प्रॉडक्शन टीममध्येही तो होता. अनिल कपूरलाही करण चांगलाच भावतो, असे समजतेय.

Read More