Marathi News> मनोरंजन
Advertisement

आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यनं सलमानला भेट दिली भगवत गीता; भाईजाननं काय केलं पाहा...

Salman Khan Aniruddhacharya :  सलमान खानला आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यांनी भेट दिली भगवत गीता...

आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्यनं सलमानला भेट दिली भगवत गीता; भाईजाननं काय केलं पाहा...

Salman Khan Aniruddhacharya : बॉलिवूड अभिनेता सलमान खान 'बिग बॉस' च्या आणखी एका पर्वाचं सुत्रसंचानल करताना दिसणार आहे आणि 6 ऑक्टोबर रोजी म्हणजे आज त्याचा प्रीमियर होणार आहे. या ग्रॅँड प्रीमियरच्या पहिल्या एपिसोडचं शूट झालं आहे. इतकंच नाही तर त्यावरून एक गोष्ट समोर आली की या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांमध्ये एक आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य देखील सहभागी झाले होते. त्यांचा एक फोटो आधीपासून सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य हे सलमान खानला भगवत गीता देताना दिसत आहेत. 

सेटवरील व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य हे सलमान खानला भगवत गीताची एक कॉपी भेट करताना दिसत आहेत. तर सलमाननं या पवित्र ग्रंथाचा सन्मान करत स्वीकारले. सलमाननं गीतेच कॉपी हातात घेतली असून अनिरुद्धाचार्य हसत पोज देताना दिसत आहेत. फोटो सोशल मीडियावर आधी देखील व्हायरल झाला आहे. लक्षवेधी गोष्ट म्हणजे अनिरुद्धाचार्य 'बिग बॉस 18' मध्ये दिसणार नाही आहे. आध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य जी हे फक्त स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी सेटवर आलेत. या व्हायरल फोटोच्या कॅप्शनमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की अनिरुद्धाचार्य जी महाराज शो आणि स्पर्धकांना आपला आशीर्वाद देण्यासाठी #BiggBoss18 च्या सेटवर आलेले महाराजजी यांनी सलमान खानला ही भगवत गीता भेट दिली. 

हेही वाचा : 'पोरं दहशतवादी होतील'; मुस्लिमाशी लग्न करण्याच्या निर्णयानंतर अभिनेत्रीला दिले जात होते धक्कादायक सल्ले

या वर्षी बिग बॉसच्या घराची थीम देखील मजेशीर दिसत आहे. सेट ते ऑनलाइन समोर आलेल्या व्हिडीओ आणि फोटोंना पाहून असं वाटलं की निर्माते गुफेच्या थीमवर काम करत आहेत. जुन्या काही गोष्टी, अनेक मुर्त्या आणि एक डार्क थीममध्ये बनवण्यात आलेल्या या घराची सगळेच स्तुती करत आहेत. खरंतर, नेमकी थीम काय आहे हे कळेल. घराला डिझाइन करण्यासाठी 45 दिवस लागले आणि जवळपास 200 लोकांना रोजगार मिळाला. बिग बॉसचं हे घर आर्ट डायरेक्टर ओमंग कुमारनं डिझाइन केलंय. त्यांनी डिझाइन करताना भारतीय कलेवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे. 

Read More