Marathi News> मनोरंजन
Advertisement

'अनिता भाभीं'चं अनोख्या पद्धतीनं घरात स्वागत

 'भाभीजी घर पर हैं' मालिका फेम अभिनेत्री सौम्या टंडनने पुन्हा मालिकेत पदार्पण केले.

'अनिता भाभीं'चं अनोख्या पद्धतीनं घरात स्वागत

मुंबई : 'भाभीजी घर पर हैं' मालिका फेम अभिनेत्री सौम्या टंडनने पुन्हा मालिकेत पदार्पण केले. तब्बल चार महिन्यानंतर अनिता भाभी मालिकेत आपली भूमिका बजावणार आहे. सौम्या टंडन पुन्हा मालिकेत परतल्यामुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद होताना दिसत आहे. गर्भधारणा कालावधीत सौम्य टंडनने ४ महिन्यांचा ब्रेक घेतला होता. सौम्याला 'भाभीजी घर पर हैं' मालिकेच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. सौम्याने स्वत:च्या सोशल अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिचे सह कलाकार  स्वागत करताना दिसत आहेत.

"तुम आए तो आया मुझे याद गली में आज चांद निकला." गण्याणं सौम्याचं मोठ्या  उत्साहात स्वागत करण्यात आलं. तिच्या एन्ट्रीमुळे मालिकेच्या सेटवर आनंदी वातावरण हेतं. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Our bundle of joy!

A post shared by Saumya Tandon (@saumyas_world_) on

सौम्याने २०१६ मध्ये बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसह लग्न बेडीत अडकली. लग्ना आधी २ वर्षे हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. शेवटी त्यांच्या प्रेमाचे रूपांतर नात्यात झाले. २० जानेवारी २०१९ मध्ये तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

सौम्या टंडन मोठ्या काळापासून 'भाभीजी घर पर हैं' मालिकेमध्ये आपली भूमिका चोखरित्या बजावत आहे. मालिकेमधील तिच्या ग्लॅमरस अदा चाहत्यांना जास्त आकर्षित करत आहे. 

Read More