Marathi News> मनोरंजन
Advertisement

...जेव्हा लग्न मंडपात अंकितने बायकोला घेतलं उचलून

 'फर्जंद' या मराठी सिनेमातून अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमध्ये अंकितने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेस विषयी विविध गोष्टी अंकित सोशल मिडीयावर पोस्ट करतो.

...जेव्हा लग्न मंडपात अंकितने बायकोला घेतलं उचलून

 मुंबई : 'फर्जंद' या मराठी सिनेमातून अभिनेता अंकित मोहनने मराठी सिनेविश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदी मालिका, वेबसिरीज, चित्रपटांमध्ये अंकितने आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. सोशल मिडीयावरही त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. फिटनेस विषयी विविध गोष्टी अंकित सोशल मिडीयावर पोस्ट करतो.

 मात्र सगळ्यात जास्त लक्ष वेधतात ते अंकितच्या पत्नी रुचिसाठीच्या पोस्ट.. रुचिच्या प्रेमात बुडालेला अंकिता बऱ्याचदा रुचिसोबतचे रोमॅन्टिक क्षण पोस्ट करत सगळ्याच लक्ष वेधतो. अशीच एक खास पोस्ट अंकितने नुकतीच केली आहे.

या पोस्टमध्ये अंकितने रुचि आणि त्याच्या लग्नातील काही खास क्षण शेअर केले आहेत. या व्हिडीओत अंकितने रुचिला उचलून घेतलं आहे. एकत्र प्रवास सुरु करत असल्याचा आनंद या दोघांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो आहे. हा आनंद त्यांनी लग्नामंडपात खास डान्स करत व्यक्त केलंय..

 

अंकित लिहितो की, "माझी बायको.. असं मी सारखं सारखं म्हणेन.. माझी बायको रुचि.. जेव्हा चांदनी चौक महाराष्ट्राला भेटते" ही पोस्ट पाहुन रुचिसुद्धा आनंदी झाली आहे. तिनेही या पोस्टवर कमेंट करुन हे खूप क्यूट असल्याचं म्हटलंय.

2015 मध्ये दोघांनी लगीनगाठ बांधली होती. याशिवाय दोघांनी अनेक प्रोजेक्टसमध्ये एकत्र कामंही केली आहेत. 'घर आजा परदेसी' या मालिकेत दोघं एकत्र झळकले होते.

Read More