Marathi News> मनोरंजन
Advertisement

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. 

अंकिता कोनवारने मिलिंद सोमणप्रती व्यक्त केलं प्रेम

मुंबई : प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची प्रेयसी अंकिता कोनवर हिच्याशी नुकताच विवाहबंधनात अडकला. अलिबागमध्ये दोघांनी एकमेकांशी जन्मगाठ बांधली. अंकिता आणि मिलिंदच्या विवाहसोहळ्यास मोजक्याच आणि जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या. ५२ वर्षीय मिलिंद आणि त्याच्याहून जवळजवळ दुपटीने कमी वय असलेल्या २५ वर्षीय अंकिताशी त्याने लग्नगाठ बांधली. 

त्यांच्या वयातील अंतरावरुन सोशल मीडयावर अंकिता आणि मिलिंद यांना चांगलेच ट्रोल करण्यात येत होते. लग्नाच्या दिवसापर्यंत अनेकांनी यावर आक्षेप नोंदवला होता. जेव्हा मिलिंदने पहिल्यांदा अंकिताबरोबरच्या नात्याबाबत खुलासा केला होता तेव्हा अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. मात्र लोकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत हे दोघेही साताजन्मासाठी एकत्र आलेत.

अंकिताने लग्नानंतर नवऱ्याप्रती कवितेद्वारे प्रेम व्यक्त केलेय. 

 

Love always finds it’s way #foreveryouandi

A post shared by Ankita Konwar (@earthy_5) on

 

Read More