Ankita Lokhande Pregnancy: अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अंकिता तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. अंकिता लोखंडेने विक्की जैनसोबत लग्न केलं आहे. तिचा नवरा विक्की जैन हा देखील सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सध्या दोघेही लाफ्टर शोमध्ये दिसत आहेत.
दरम्यान, या शोचा एक नवीन प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने चाहत्यांसाठी आनंदाची बातमी शेअर केली आहे.
अंकिता लोखंडेने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
या शोच्या प्रोमोमध्य अंकिता लोखंडे आणि कृष्णा अभिषेक संवाद साधत असल्याचं दिसत आहे. अशातच अंकिता लोखंडे आणि कृष्णा अभिषेक यांच्यात चेष्टा मस्करीचा प्रसंग निर्माण होते. त्यावेळी अंकिता ही कृष्णा अभिषेकच्या मागे धावते. त्यावेळी अंकिता लोखंडे म्हणते की, मी प्रेग्नेंट आहे. हे ऐकून तेथील सर्व सदस्य आश्चर्यचकित होतात. त्यावेळी कृष्णा अभिषेक अंकिताला विचारतो की, खरचं.. त्यावेळी अंकिता हसते. त्यानंतर कृष्णा अभिषेक गाणं गातो. आज हमारे घर में आ रहा लल्ला है. हे ऐकून करण कुंद्रा देखील आश्चर्यचकित होतो.
आता अंकिता लोखंडेचे हे विधान किती सत्य आहे हे आपल्याला येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे. कारण याआधी देखील अंकिता लोखंडेने लॉकअप शोमध्ये देखील प्रेग्नेंशीसंदर्भात प्रॅक केला आहे. तिचा हा व्हिडीओ कलर्स टीव्हीने शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, अंकिताने आनंदाची बातमी देऊन लाफ्टर शेफला गोंधळात टाकलं आहे.
अंकिता लोखंडे हिने बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. त्यांच्या दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती. लग्नानंतर दोघेही अनेक शोमध्ये एकत्र दिसत आहेत. विक्की जैन आणि अंकिता लोखंडे यांनी स्मार्ट जोडी या शोमध्ये सहभाग घेतला होता. या शोमध्ये ते विजेते ठरले होते. यानंतर दोघेही बिग बॉसमध्ये दिसले. त्यानंतर आता दोघेही लाफ्टर शेफ या कॉमेडी शोमध्ये धमाल करताना दिसत आहेत.