Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ankita Lokhande लग्नानंतरच्या पहिल्या रात्री दिसली या व्यक्तीसोबत, भडकलेल्या पतीने...

पण या कपलने आपला हनीमून प्लॅनच रद्द 

Ankita Lokhande लग्नानंतरच्या पहिल्या रात्री दिसली या व्यक्तीसोबत, भडकलेल्या पतीने...

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर रोजी तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नबंधनात बांधली. दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अंकिताच्या लग्नसोहळ्याला टेलिव्हिजन विश्वातील आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

त्यानंतर अंकिता हनीमूनला कुठे जाणार याबाबत चर्चा सुरु झाली होती. पण या कपलने आपला हनीमून प्लॅनच रद्द केल्याचं दिसून आलं. अंकिता आणि विकी यांचे लग्नानंतरच्या एका नाईट पार्टीचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. 

अंकिताने विकी जैनच्या घरात एन्ट्री घेतल्यानंतर तिने एका नाईट पार्टीचं आयोजन केलं होतं. अंकिताच्या मैत्रिणींसोबतच टीव्ही इंडस्ट्रीतील निम्म्याहून अधिक लोकांनी या पार्टीला हजेरी लावली. या पार्टीत अपर्णा दीक्षित, मृणालिनी त्यागी, महेश शेट्टी, अनिशा शेट्टी, दलजीत कौर आणि आशिता धवन असे अनेक सेलिब्रिटी दिसले. 

त्यातच या पार्टीतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात लग्नानंतरच्या पहिल्या रात्री अंकिता पती विकीसोबत नाही, तर एका वेगळ्याच व्यक्तीसोबत दिसत आहे. या दोघांनी हातात हातधरुन बोलायला सुरुवात करताच तिचा पती तिथे पोहोचतो . त्यानंतर तो अंकिताला तेथून घेऊन जातो.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकितासोबतचा हा व्यक्ती सेलिब्रिटी कलाकार आहे. टेलिव्हिजनवर अनेक निगेटीव्ह पात्र साकारणार करणवीर बोहरा यावेळी अंकितासोबत प्ल्रट करताना दिसला.
खरंतर हा व्हिडिओ एक विनोदी व्हिडिओ आहे. ज्यात अंकिता आता ती जैन कुटुंबाची सुन बनली आहे, हे फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

दोघांनी हा मजेशीर व्हिडिओ या पार्टीत शूट केला आहे. करण वोहरा आणि अंकिता लोखंडे हे दोघेही टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कलाकार आहेत.

 

 

Read More