Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर प्रतिक्षा संपली, या दिवशी अडकणार अंकिता लोखंडे लग्नबंधनात

मनोरंजन इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचं वातावरण आहे.

अखेर प्रतिक्षा संपली, या दिवशी अडकणार अंकिता लोखंडे लग्नबंधनात

मुंबई : मनोरंजन इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचं वातावरण आहे. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी नुकतेच सात फेरे घेऊन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाच्या बातम्याही येत आहेत. टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यनेही लग्नगाठ बांधली आहे. आता छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्न करणार आहे.

अंकिता लवकरच वधू होणार आहे. तिच्या लग्नाचे डिटेल्स बाहेर आले आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचं लग्न, हळदी, मेहेंदी, संगीत या सगळ्याची तारीख आता बाहेर आली आहेत. एका रिपोर्टनुसार, अंकिता आणि विकीच्या लग्नाचे सगळे फंक्शन, हळदीपासून मेहंदी, संगीत आणि लग्न हे १२ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार आहेत. या लग्नात फक्त निवडक लोकांनाच बोलावलं जाईल. या सोहळ्याला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत.

वृत्तानुसार, अंकिता लोखंडेचा मेहंदी सोहळा १२ डिसेंबरला होणार आहे. या कपलच्या हळदी समारंभासाठी 13 डिसेंबर तारीख निश्चित करण्यात आली आहे. यानंतर संगीताचा कार्यक्रम होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 14 डिसेंबरला हे जोडपं लग्नबंधनात अडकणार आणि त्यानंतर संध्याकाळी रिसेप्शनचं आयोजनही केलं जाणार आहे. या लग्नासाठी प्रत्येक फंक्शनला लक्षात घेऊन वेगवेगळ्या थीम देखील ठेवण्यात आल्या आहेत.

अंकिताने 2006 मध्ये टॅलेंट हंट रिअॅलिटी शो आयडिया झी सिनेस्टारमधून तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अंकिताला एकता कपूरच्या पवित्र रिश्ता शोमध्ये टीव्ही जगतातील पहिला आणि सर्वात मोठा ब्रेक मिळाला.

Read More