Marathi News> मनोरंजन
Advertisement

विकीसोबत 'पवित्र रिश्ता' बांधण्यास अंकिता सज्ज; लग्नातील पहिला फोटो Viral

नात्याची अधिकृत घोषणा केल्या क्षणापासून...

विकीसोबत 'पवित्र रिश्ता' बांधण्यास अंकिता सज्ज; लग्नातील पहिला फोटो Viral

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा प्रियकर विक्की जैन (Vicky Jain) अखेर एका नव्या नात्याची सुरुवात करण्यास सज्ज झाले आहेत. अंकिता आणि विकी यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केल्या क्षणापासून या जोडीबाबत चाहत्यांमध्ये कुतूहल पाहायला मिळालं होतं. 

अंकिताच्या स्पिन्स्टर्स पार्टीनंतर ती नेमकी लग्नाची तारीख केव्हा जाहीर करणार याबाबतची उत्सुकता चाहत्यांना असतानाच तिनं सर्वांनाच एक सरप्राईज दिलं. 

शुक्रवारी सकाळीच तिनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लग्नाचे संकेत दिले. लग्नाआधीच्या प्रथा..., परंपरा अशा आशयाचं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं. 

पोपटी रंगाची साडी, त्यावर गुलाबी रंगाची भरजरी किनार आणि कपाळी मोत्याच्या मुंडावळ्या, कुंकवाचा टिळा असं अंकिताचं नववधू रुप सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहे. 

फक्त अंकिताच नव्हे, तर तिचा होणारा पती विनीत जैन यानंही या क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये विनीतही मराठमोळ्या अंदाजात मुंडावळ्या बांधून दिसत आहे. 

छोट्या पडद्यापासून सुरुवात करणारी ही अभिनेत्री आता खऱ्या जीवनात 'पवित्र रिश्ता' बांधण्यास सज्ज झाली आहे हे पाहून चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

दणक्यात प्री वेडिंग पार्टी झाल्यानंतर आता मराठमोळ्या पद्धतीनं अंकिता आणि विकी लग्नबंधनात अडकणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Jain (@jainvick)

रितसर हळद, मंगलाष्टकं, वरमाला, सप्तपदी असा सारा घाट या लग्नाच्या निमित्तानं घालण्यात येण्यात आहे. 

विकी आणि अंकिताच्या लग्नाला निवडक पाहुण्यांचीच उपस्थिती असणार आहे असं सांगण्यात येत आहे. आता या जोडीच्या वेडिंग लूकवरच चाहत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. 

Read More