Marathi News> मनोरंजन
Advertisement

'इतकी' आहे अनुष्का-विराटची वर्षाची कमाई!

हा आकडा तुम्हाला थक्क करेल...

'इतकी' आहे अनुष्का-विराटची वर्षाची कमाई!

मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीसाठी सध्याचा इंग्लंड दौरा काही खास नव्हता. टी २० सिरीजच्या तीन सामन्यांमध्ये कब्जा करणारा विराट वनडे मध्ये मात्र कमाल करु शकला नाही. 

विराटची कमाई

या व्यतिरिक्त देखील कर्णधार विराट कोहली कमाईत मात्र अव्वल आहे. अलिकडेच जाहीर झालेल्या रिपोर्टनुसार, क्रिकेटर विराट कोहली वर्षाला ६० मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे ३८२ कोटी रुपये कमावतो. इंटरनॅशनल क्रिकेट मॅचेस, आयपीलएल आणि जाहिराती यातून विराट इतकी कमाई करतो. परसेप्ट प्रोफाईल लिमिटेडने हा अहवाल सादर केला आहे. 

अनुष्काची कमाई

परसेप्ट प्रोफाईल लिमिटेडचे ब्रॅँड अनालिस्ट आणि ज्वॉईंट मॅनेजिंग डिरेक्टर शैलेंद्र सिंगने सांगितले की, कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची वर्षाची कमाई ३५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच २२० कोटी इतकी आहे.

येत्या दोन वर्षात असेल इतकी कमाई

यानुसार दोघांची एकत्र कमाई ९५ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ६०० कोटी आहे. दोघांची वाढती लोकप्रियता पाहता येणाऱ्या दोन वर्षात दोघांची एकूण कमाई १००० कोटी रुपये असेल.

Read More