Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनिल कपूरच्या यशामागे 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा हात!

बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आपल्या जीवनात आणि करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला देतो.

अनिल कपूरच्या यशामागे 'या' बॉलिवूड अभिनेत्याचा हात!

मुंबई : बॉलिवूडचा एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूर आपल्या जीवनात आणि करिअरमध्ये मिळालेल्या यशाचे श्रेय बॉलिवूडमधील एका अभिनेत्याला देतो. याचा उलघडा अलिकडेच झाला आहे.

कोण आहे तो अभिनेता?

झी सिने अॅवार्ड २०१७ मध्ये सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार अनिल कपूरने पटकावला. याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी अनुपम खेर यांनी ट्वीट केले. त्यात ते म्हणाले की, “डियर अनिल कपूर! प्रत्येक वर्ष तुझ्यासाठी खास राहो. पुर्ण मेहनत आणि उत्साहाने तू काम करत रहा, जे अत्यंत दुर्मिळ आहे.”

अनिल कपूर म्हणाला...

यानंतर अनिल बोलला की, "माझे जीबन आणि करिअर तुम्ही दिलेल्या मैत्री आणि नेहमी दिलेल्या समर्थानाशिवाय काहीच नाही. एक मित्र म्हणून विश्वास केल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे."

दोघांचे एकत्र काम 

दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘हम आपके दिल में रहते हैं’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘1942 : ए लव स्टोरी’, ‘लाडला’ आणि ‘राम लखन’ हे त्यापैकी काही मुख्य चित्रपट. सध्या अनिल कपूर फन्ने खां या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे.

 

Read More