Sudhanshu Pandey on Ram Kapoor : अभिनेता राम कपूरनं काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह कमेंट केल्या ज्यामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. इतकंच नाही तर त्याचा 'मिस्त्री' शोच्या प्रमोशनमधून देखील त्याला काढण्यात आले. आता राम कपूरच्या या वक्तव्यावर 'अनुपमा' फेम अभिनेता सुधांशु पांडेनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं राम कपूरच्या वक्तव्यासाठी संपूर्ण छोट्या पडद्यावरील इंडस्ट्रीच्या वतीन माफी मागितली आहे. त्यासोबत म्हटलं की राम कपूरनं जे काही म्हटलं ते त्याच्या मानसिक असंतुलनाकडे निर्देश करते.
खरंतर, राम कपूरनं नुकत्याच त्याच्या 'मिस्त्री' या शोच्या प्रमोशन दरम्यान, काही आक्षेपार्ह्य आणि वाईट कमेंट केल्या होत्या. असं म्हटलं जातं की रामनं शोच्या मार्केटिंग टीमच्या एका मेल एक्जीक्यूटिवला किस करण्याविषयी वक्तव्य केलं आहे. तर कामाचं प्रेशर विषयी बोलताना राम कपूरनं सांगितलं की त्याला असं वाटलं जणू काही गॅन्गरेप झाला आहे.
या वक्तव्यामुळे राम कपूर हा चर्चेत आला आणि निर्मात्यांनी त्याला 'मिस्त्री' च्या प्रमोशनमधूनच बाहेर केलं. त्यावर सुधांशु पांडेनं टीव्ही इंडस्ट्रीकडून माफी मागितली. त्यानं 'फिल्मीबीट' ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की 'पहिली गोष्ट ही आहे की जर रामनं असं केलं तर तो रामचं नाव खराब करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की जर तुम्ही मानसिक रित्या ठीक नसाल, तर तुम्ही अशा गोष्टीच बोलतात.'
सुधांशु पांडेनं पुढे सांगितलं की 'कोणत्याही मुलीच्या कपड्यांविषयी किंवा तिच्याविषयी. तर हे मानसिक अस्थिरतेचं एक लक्षण आहे. आम्ही तर प्रत्येक व्यक्तीशी आदरानं बोलतो प्रत्येकाचा आदर करतो. तर मुलींविषयी तर खूप मोठी गोष्ट झाली ना. कोणत्या महिलेसाठी जर तुम्ही अपमानास्पद शब्द वापरत असाल किंवा त्यांच्यासाठी काही चुकीचे इशारे देत असाल तर हे खूप वाईट आहे. मला माहित नाही, पण जर रामनं असं म्हटलंय. तर हे फार चुकीचं आहे. खूप जास्त चुकीचं आहे. मी माफी मागतो की माझ्या इंडस्ट्रीतून कोणी असं केलं आहे.'
हेही वाचा : कोहली एका 'इन्स्टा' पोस्टसाठी किती कोटी रुपये घेतो माहितेय? आकडा ऐकून चक्रवाल
या प्रकरणात वाद वाढता पाहून राम कपूरं माफी मागितली. त्यानं 'ईटाइम्स' शी बोलताना सांगितलं की 'सगळ्यात आधी तर मला फक्त इतकं सांगायचं आहे की 'माझ्यावर जे काही आरोप लगावण्यात आले आहेत. ते सगळं मी म्हणालो. त्यामुळे सत्य हेच आहे की मी दोषी आहे. पण मी माझ्या बचावात इतकंच सांगू इच्छित आहे की जेव्हा केव्हा मी अशा लोकांसोबत राहिलो. तेव्हा मी बिंदास्थ होऊन बोलतो. जे लोकं मला ओळखतात आणि ज्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे, त्या सगळ्यांना माहित आहे की मी असाच आहे आणि माझा काही आक्षेपार्ह बोलण्याचा विचार नव्हता.'