Anupama : स्टार प्लसवर सुरु असलेली 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या आगीमुळे परिसारत धुराचे लोट पसरलेले दिसत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत मालिकेच्या सेटचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. ही आग कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, या आगीत मालिकेचा संपूर्ण सेट जळून खाक झाला आहे. ही आग मालिकेचे शूटिंग सुरु होण्याच्या दोन तास आधी लागल्याची माहिती समोर येत आहे. ही आग सकाळी 5 वाजता लागली होती. त्यानंतर 7 वाजता या मालिकेच्या शूटिंगला सुरुवात होणार होती. त्यासाठी मालिकेच्या क्रू मेंबर्स आणि कलाकारांनी पूर्ण तयारी देखील केली होती. मात्र, शूटिंग सुरु होण्याच्या काही तासांआधीच या सेटला मोठी आग लागली. यात मोठं नुकसान झालं आहे. AICWA ने या घटनेनंतर चौकशीची मागणी केली आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
माहितीनुसार, सकाळी 5 वाजता आग लागल्यानंतर 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर अनेक कर्मचारी आणि क्रू मेंबर्स देखील उपस्थित होते. मात्र, शूटिंगला वेळ असल्यामुळे त्या ठिकाणी कोणाही नसल्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या या आगीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आग मोठी असल्यामुळे यात संपूर्ण सेट जळून खाक झाला आहे.
याआधी देखील 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये वीजेटा करंट लागल्यामुळे मालिकेच्या सेटवर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना 14 नोव्हेंबरला घडली होती. त्यानंतर सेटवर असणाऱ्या सर्वांनाच एक धक्का बसला होता.
'अनुपमा' मालिकाने जिंकली प्रेक्षकांची मने
'अनुपमा' मालिका ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहे. ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये आहे. या मालिकेत अभिनेत्री रुपाली गांगुलीने अनुपमाची भूमिका साकारली आहे. मात्र, या मालिकेसाठी रुपाली गांगुली ही पहिली पसंत नव्हती. त्याआधी डायरेक्टरने ही भूमिका जुही परमार, साक्षी तन्वर, श्वेता तिवारीला ऑफर केली होती.