Marathi News> मनोरंजन
Advertisement

18 वर्षांनंतर 'मेट्रो...इन दिनो' घेऊन आले अनुराग बसू; कोणाची होती 'ही' कल्पना

metro in dino: दिग्दर्शक अनुराग बसू सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. 'मेट्रो...इन दिनो' हा त्यांचा नवा चित्रपट 18 वर्षांपूर्वीच्या 'लाइफ इन अ मेट्रो'चा सिक्वेल आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट पुन्हा का बनवला आणि त्याची कल्पना कुणाची होती, याचा खुलासा केला.

18 वर्षांनंतर 'मेट्रो...इन दिनो' घेऊन आले अनुराग बसू; कोणाची होती 'ही' कल्पना

Anurag Basu On Metro In Dino: 18 वर्षांपूर्वी आलेल्या 'लाइफ इन अ मेट्रो'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं. त्या चित्रपटातील कथा आणि पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. आता अनुराग बसू 'मेट्रो...इन दिनो' घेऊन आले आहेत, जो त्या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. हा चित्रपट अनुराग बसू यांच्या हायपरलिंक सिनेमांमधील शेवटचं प्रोजेक्ट असणार आहे.

हा चित्रपट नातेसंबंधातील गुंतागुंत दाखवतो आणि त्यातील चार वेगळ्या कथा मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि बंगळुरू या शहरांवर आधारलेल्या आहेत. अनुराग बसू यांनी सांगितलं की, हा चित्रपट त्यांच्या जिव्हाळ्याचे कलाकार इरफान खान आणि के.के. यांना श्रद्धांजली म्हणून देखील आहे. विशेष म्हणजे, 'मेट्रो...इन दिनो' बनवण्याची कल्पना स्वतः इरफान खान यांचीच होती.

इरफान खान यांची कल्पना
अनुराग म्हणाले, 'जग्गा जासूस'नंतर मी आणि इरफान एकदा गप्पा मारत होतो, तेव्हा त्यांनी मला 'मेट्रो 2' करायला सांगितलं. हे त्यांनी पहिल्या चित्रपटाच्या लगेच नंतर नाही, काही वर्षांनी सुचवलं होतं. 2017 मध्ये इरफान यांनी या चित्रपटासाठी होकारही दिला होता, पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले.'

हायपरलिंक सिनेमांबद्दल भीती होती
अनुराग पुढे म्हणाले, 'पहिला मेट्रो बनवताना मला भीती वाटत होती की प्रेक्षकांना तो आवडेल की नाही. पण नंतर त्याचं काम करणं आवडू लागलं. 'लाइफ इन अ मेट्रो'नंतर 'लुडो'सारखा चित्रपट केला. आता 'मेट्रो...इन दिनो' हा कदाचित हायपरलिंक सिनेमांचा माझा शेवटचा चित्रपट ठरेल, पण हे पूर्णपणे नाकारत नाही.'

वेगळ्या कथा लिहिणं आव्हानात्मक
ते म्हणाले, 'असे चित्रपट लिहायला वेळ लागतो, कारण त्यात चार स्वतंत्र कथा असतात. पण त्यात मजाही असते, कारण अनेक चांगल्या कलाकारांसोबत एकाच वेळी काम करता येतं. सध्या तरी हा शेवटचा वाटतो, पण भविष्यात कदाचित पुन्हा असं काही करेन.'

नात्यांमुळे बदललेले दृष्टीकोन
ते पुढे म्हणाले, 'लाइफ इन अ मेट्रो'च्या काळात भारतात डेटिंग अॅप्स लोकप्रिय नव्हते, पण आता परिस्थिती बदलली आहे. लोक समोरासमोर बोलण्यापेक्षा ऑनलाईन अधिक मोकळेपणाने बोलतात. नात्यांमुळे मला स्त्रीच्या नजरेतून जग पाहायला, शिकायला मिळालं आणि यामुळे मी एक चांगला कथाकार झालो.'

4 जुलैला थिएटरमध्ये येणार
या चित्रपटाचा ट्रेलर जूनमध्येच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो चांगलाच आवडला आहे. 'मेट्रो...इन दिनो' हा चित्रपट याच महिन्यात, 4 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read More