Marathi News> मनोरंजन
Advertisement

अनुराग कश्यपकडे नव्हते लेकीच्या लग्नासाठी पैसे; 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यानं अनोख्या पद्धती केली आर्थिक मदत

Anurag Kashyap Daughter Wedding :अनुराग कश्यपकडे नव्हते लेकीच्या लग्नासाठी पैसे, 'तो' कोण आहे जो मदतीला आला धावून?

अनुराग कश्यपकडे नव्हते लेकीच्या लग्नासाठी पैसे; 'या' दाक्षिणात्य अभिनेत्यानं अनोख्या पद्धती केली आर्थिक मदत

Anurag Kashyap Daughter Wedding : बॉलिवूडचा लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप ही डिसेंबर 2024 मध्ये मुंबईत लग्न बंधनात अडकली. आलियानं तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोइरेसोबत लग्न केलं. त्यानंतर त्यांनी एक खास अशा रिसेप्शनचं आयोजन केलं होतं. त्यांच्या या रिसेप्शन पार्टीत बॉलिवूड कलाकारांपासून दाक्षिणात्य कलाकारांनी देखील हजेरी लावली होती. दरम्यान, आता दिग्दर्शक अनुराग कश्यपनं खुलासा केला आहे की तो त्याच्या मुलीच्या लग्नाचा खर्च उचलू शकत नव्हता. त्याला अभिनेता विजय सेतुपतीनं मदत केली म्हणून त्याला थोडा हातभार लागला.

अनुराग कश्यपनं फक्त चित्रपट दिग्दर्शन केलं नाही तर त्यासोबत त्यानं 3-4 चित्रपटांमध्ये खलनायकाचं आणि सहकलाकाराचं काम केलं आहे. त्यानं तमिळमध्ये सुपरहिट ठरलेल्या 'महाराजा' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्या चित्रपटात विजय सेतूपती हा महत्त्वाच्या भूमिकेत होता. तर अनुराग कश्यपसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा होता कारण त्याला त्याची लेक आलियाच्या लग्नासाठी पैसे जमवायचे होते. या विषयी अनुराग कश्यपनं 'द हिंदू' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

अनुराग कश्यपनं सांगितलं की 'जेव्हा तो राहुल भट्ट आणि सनी लियोनी यांच्या केनेडीच्या पोस्ट प्रोडक्शनवर काम करत होता. तेव्हा त्याची भेट विजय सेतुपतीशी झाली. 'इमाइका नोडिगल' नं मी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांना नकार दिला होता. दर दोन दिवसानंतर मला ऑफर येत होत्या. मग केनेडीच्या पोस्ट-प्रोडक्शन दरम्यान, विजय सेतुपतीला भेटलो. त्यांनं मला सांगितलं की खूप चांगली स्क्रिप्ट आहे, ज्यात मी असावं अशी त्याची इच्छा आहे. पण सुरुवातीला मी नकार दिला होता.'

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

हेही वाचा : 'या' अभिनेत्रीला वडिलच म्हणायचे 'प्रॉस्टिट्यूट'; आईला म्हणायचे 'रात्री 3 वाजता धंदा करायला...'

अनुराग कश्यपनं सांगितलं की 'त्यानं लेक आलियाच्या लग्नाच्या खर्चाच्याविषयी विजय सेतुपतीसोबत चर्चा केली आणि त्यानंतर त्यानं अभिनेता म्हणून काम मिळवून देण्यास मदत केली. मी त्याला म्हणालो की मला पुढच्या वर्षी माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे आणि मला वाटत नाही की मी खर्च उचलू शकेल. तर विजय म्हणाला की मी तुझी मदत करेन आणि अशा प्रकारे महाराजा बनला आणि मला भूमिका मिळाली.'

Read More