Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर अनुष्कानं दिली 'गुड न्यूज'

नववधू अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या संसाराची सुरुवात करतेय... याच दरम्यान अनुष्कानं तिच्या फॅन्सला एक 'गुड न्यूज' दिलीय. 

लग्नानंतर अनुष्कानं दिली 'गुड न्यूज'

मुंबई : नववधू अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या संसाराची सुरुवात करतेय... याच दरम्यान अनुष्कानं तिच्या फॅन्सला एक 'गुड न्यूज' दिलीय. 

फोर्ब्स मॅगझीननं नुकतंच फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटी १०० ची लिस्ट जाहीर केलीय. या लिस्टमध्ये अनुष्काला दुसऱ्यांदा सहभागी करण्यात आलंय. परंतु, अनुष्कासाठी स्पेशल गोष्ट म्हणजे तिचा क्लोदिंग ब्रान्ड 'नुश'लाही फोर्ब्सनं जागा दिलीय.

ही गोष्ट अनुष्काला समजल्यानंतर तीनं लगेचच सोशल मीडियावरून ही गोष्ट तिच्या फॅन्सपर्यंत पोहचवलीय. 

२६ डिसेंबर रोजी अनुष्का आणि विराटच्या लग्नाची मुंबईत रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आलीय. यानंतर हे जोडपं टीम इंडियासोबत साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात विराट तीन टेस्ट, सहा वनडे आणि तीन टी-२० मॅच खेळणार आहे.
 

Read More