Marathi News> मनोरंजन
Advertisement

पुन्हा एकदा अनुष्का शर्मा ट्रोल

काय आहे हा प्रकार 

पुन्हा एकदा अनुष्का शर्मा ट्रोल

मुंबई : इंटरनेटच्या या जगात कधी, कोण, कसं ट्रोल हे सांगता येत नाही. खास करून सेलेब्स ट्रोल होतात तेव्हा नेटीझन्स जास्त मजा घेतात. सेलिब्रिटींच्या प्रत्येक कृतीवर बारिक लक्ष असतं. तुम्ही काय करता? कुठे जाता? कुणाला भेटता याकडे सगळ्यांच लक्ष असतं. असंच काहीसं अनुष्काच्या बाबतीत होत आहे. ती सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की, अनुष्का शर्मा 'गूगलच्या पिक्सल 2XL' ला सर्वाधिक प्रमोट करताना दिसत आहे. अशातच अनुष्काने आपले दोन फोटो शेअर केले आहेत. त्यातच अनुष्काची एक चूक समोर आली. 

अनुष्काने ट्विटरवर हे फोटो शेअर करताना 'गूगल पिक्सल 2XL'ला टॅग केलं आहे. मात्र त्यामध्ये स्पष्ट असं दिसतं की, हा फोटो आयफोनने अपलोड केलेला आहे.  

LGBT वर आधारित हे मराठी सिनेमे पाहायला विसरू नका यानंतर टेक्निकल ब्लॉगर मार्क्स ब्राऊनलीने अनुष्काच्या या पोस्टखाली प्रतिक्रिया दिली आहे. मार्क्सने अनुष्काची ही चूक हायलाईट करून दाखवली. तेव्हा तो म्हणाला की, मला माहित नाही की हे कसं झालं. हे खूप हास्यजनक आहे.

Read More