Marathi News> मनोरंजन
Advertisement

Vamika complete 6 Months : विरूष्काचा लेकीसोबतचा खास क्षण

वामिकाचा अतिशय गोड फोटो केला शेअर

Vamika complete 6 Months : विरूष्काचा लेकीसोबतचा खास क्षण

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीची मुलगी वामिका ६ महिन्यांची झाली आहे. हा क्षण सेलिब्रेट करण्यासाठी या दोघांनी खूप साधे पद्धतीने साजरा केला. विरूष्काने वामिकासोबत एका गार्डनमध्ये छान असा वेळ घालवला. याचे फोटो अनुष्काने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

अनुष्का, विराट वामिकाला आपल्या कुशीत घेऊन दिसत आहेत. यावेळी अनुष्काने पिंक शर्ट आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये दिसत आहे. मोकळ्या आकाशाकडे बोट दाखवत वामिकाला निळं आकाश दाखवत आहे. 

दुसऱ्या फोटोत वामिका बाबा विराटकडे दिसत आहे. वामिकाने गुलाबी आणि पिच रंगाचा स्ट्राइप्ड फ्रॉक घातला आहे. या फोटोंमध्ये अनुष्का शर्मा, वामिका आणि विराट हे तिघेही आपल्याला एकत्र धमाल करताना पाहायला मिळले आहेत. एका फोटोत आपण अनुष्का शर्माच्या मांडीवर वामिकाला पाहू शकतो.

 दुसर्‍या फोटोत विराट कोहली वामिकाला उचलून तिच्यासोबत खेळताना दिसत आहे. तिसर्‍या फोटोत आपल्याला वामिका आणि विराटचे पाय दिसू शकतात आणि चौथ्या फोटोत आपल्याला एक अप्रतिम केक दिसेल. हे फोटो पाहून असे दिसते की विराट आणि अनुष्का वामिकासमवेत एका पार्कमध्ये छोट्या सहलीला गेले होते, ही त्याच वेलची छायाचित्रे आहेत.

सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय

अनुष्काने सांगितलं की विराटने बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबाबत खूप विचार केला. आम्ही आमचं बाळ वाढताना लोकांना दाखवण्याची इच्छा नाही. आम्ही आमच्या मुलांना सोशल मीडियात अडकवू इच्छित नाही. पुढे जाऊन त्याचा निर्णय मुलं घेतील. आजकाल मोठ्यांनाच सोशल मीडिया हँडल करण्यात इतकी समस्या येते. हे थोडं कठीण असेल पण आम्ही हे फॉलो करु.

Read More